रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. भारत-नेपाळमधील दळणवळण यंत्रणा सक्षम बनवतानाच व्यापार आणि वाणिज्य संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेला मिळाली आहे. या मार्गावर चालवण्यात येणारे ‘डेमू’ रेक चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनविण्यात आले आहेत. जयनगर (बिहार) ते कुर्था (नेपाळ) या मार्गावर रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहो. दोन डेमू रेल्वेचा संच कोकण रेल्वे नेपाळला प्रदान करणार आहे. या प्रकल्पाच्या कामाचा नुकताच प्रारंभ झाला आहे. पुढील वर्षभर कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी काम करणार आहे.
जयनगर-कुर्था विभागातील रेल्वे सेवा, रेल्वे प्रणालीचे संचालन आणि देखभालीसाठी नेपाळ सरकारने नेपाळ रेल्वे कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गदर्शनाखाली नेपाळ रेल्वे कंपनी ही रेल्वे सेवा सुरू करत आहे. भारताचे पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानुसार कोकण रेल्वेमार्फत नेपाळ रेल्वे कंपनीला दोन डेमू संच (एका संचात पाच बोगी) वितरित केले आहेत. त्याचे उद्घाटन २ एप्रिलला झाले असून, जयनगर (भारत) आणि कुर्था (नेपाळ) मधील सीमेवर रेल्वेसेवा सुरु होणार आहे. सुरुवातीच्या प्रवासी सेवा दोन रेल्वे संचांसह सुरू केल्या जातील. ज्यांचा पुरवठा नेपाळ सरकारने केलेल्या निधीतून होणार आहे. नेपाळच्या राष्ट्रीय ध्वजावर आधारित रंगसंगतीला या रेल्वेला दिली आहे. नेपाळ रेल्वे कंपनीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला एक वर्षाच्या कालावधीत रेल्वे चालवण्यासह देखभालीसाठी नियुक्त केले आहे. या कराराचा एक भाग म्हणून, कोकण रेल्वेमार्फत गाडीचे संचालन आणि देखभाल होणार आहे. नेपाळ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देणार आहे. कोकण रेल्वे २६ तज्ज्ञ मनुष्यबळ आणि उपकरणे पुरवणार आहे. रेल्वे संचालनासाठी मूलभूत प्रणाली तयार करून रुळ आणि सिग्नलिंग देखभालीसाठी तांत्रिक सहाय्य कोकण रेल्वे करणार आहे.
कोकण रेल्वेला विशेषाधिकार
नेपाळमध्ये मजबूत रेल्वे व्यवस्था तयार करण्यासाठी भारत आणि नेपाळ सरकार यांच्या पाठिंब्याने कोकण रेल्वे, नेपाळ रेल्वे कंपनीला सहाय्य करणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध दृढ होण्यास मदत होईल. रेल्वे आणि भौतिक पायाभूत सुविधा मंत्रालयासोबत काम करण्याचे कोकण रेल्वेला विशेषाधिकार प्रदान केले आहेत.
आधुनिक यंत्रणांनी सज्ज ‘डेमू’
नेपाळमध्ये चालवण्यात येणाऱ्या डेमू रेल्वेचे संच आधुनिक बनावटीचे असून त्यामध्ये १६०० अश्वशक्ती क्षमता असलेली इंजिन जोडली आहेत. वातानुकूलित डबे, दर्जेदार सुविधा असलेली शौचालये त्यात आहेत.
भारत- नेपाळ रेल्वे सेवा
- जयनगर (भारत)- कुर्था (नेपाळ) मधील सीमा जोडणार
- सुरुवातीच्या प्रवासी सेवा दोन रेल्वे संचांसह सुरू होणार
- ‘डेमू’ रेक चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये बनविले
- रेल्वे चालवण्यासह देखभालीसाठी कोकण रेल्वेची नियुक्ती
- कोकण रेल्वेमार्फत गाडीचे संचालन आणि देखभाल
-
रुळ, सिग्नलिंग देखभालीसाठी तांत्रिक सहाय्य
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




