
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात बुधवारी (ता. 22 नोव्हेंबर) पाणी सोडले जाईल असे आश्वासन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांना दिल्यानंतर आमदार राजेश टोपे यांच्यासह शेतकऱ्यांनी साेमवारी रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे छेडलेले आंदोलन मागे घेतले. दरम्यान जायकवाडीच्या पाण्यावरुन आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याकडे देखील मराठवाड्यासह नगर, नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
जायकवाडीचा पाणीप्रश्न आता चांगलाच पेटलाय. जलसंपदा विभागाने 8.5 टीएमसी पाणी जायकवाडीत सोडण्याचे आदेश देऊनही पाणी सोडलं जात नाही. यामुळे मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतक-यांपाठाेपाठ नेते मंडळी देखील पाण्यासाठी लढा देताहेत. तर दूसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी जायकवाडीचे पाणी साेडण्याचे आदेशाला स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
|
Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल ! |
दरम्यान पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जालना रस्त्यावर साेमवारी शेतक-यांनी आंदाेलन केले. यावेऴी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात नेले. आंदाेलकर्ते आमदार राजेश टोपे यांच्यासह कार्यकर्त्यांना सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस ठाण्याच्या समोरच टोपे आणि शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर रात्री आठ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले.
जायकवाडीच्या पाण्यावर आज (मंंगळवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आणि माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनी जायकवाडी धरणात नाशिक आणि नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल केले आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने ३० ऑक्टोबर २३ रोजीच्या कार्यालयीन आदेशाने उर्ध्व गोदावरी खो-यातील धरण समूहातील जलाशयमधील पाणी पैठण धरणात सोडण्यासाठीचे आदेश पारित केले होते.
त्याअनुषंगाने मराठवाड्याला हक्काचे ८.६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. परंतु, अहमदनगर आणि नाशिक जिल्हयातील पुढाऱ्यांनी मराठवाड्याचे हक्काचे पाणी रोखून धरले व पाणी सोडण्याचे आदेश असताना देखील मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे.
जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येऊ नये व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

