सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा प्रथेप्रमाणे रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता. २२) भरत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यावर्षी यात्रा भरणार आहे.
यात्रा सोमवार (ता. २१) पासून सुरू होणार असून मुख्य दिवस मंगळवारी (ता. २२) आहे. बुधवारी (ता. २३) यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी यात्रेची तयारी अगोदरपासूनच केली आहे. पाहुण्यांसह माहेरवाशिणीना आमंत्रण दिले आहे.सौंदलगा हे सीमावर्ती गाव असल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकभक्त मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी येतात. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कौलव, कुर्डू, घोटवडे भागातील भाविक बैलगाड्याना सवारी जोडून मोठ्या प्रमाणात येतात. यावर्षी सोमवारीच या बैलगाड्यांचे आगमन होणार आहे. खेळणी, मिठाईवाले, नारळ विक्रेते, हॉटेल, आईसक्रीमचे गाडे येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे व श्री रेणुका देवीचा वार असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.
या यात्रेचा मान पाटील (गलगले) या परिवाराकडे असून यात्रेच्या मुख्य दिवशी मंगळवारी पहाटे दंडवताचा कार्यक्रम होत आहे. दंडवत झाल्यानंतर लिंब नेसण्याचा कार्यक्रम आहे. बैलगाडीतून आलेले भाविक आपल्या बैलांनाही लिंब नेसवतात. त्याबरोबरच सकाळी श्री रेणुकादेवीस महाअभिषेक घालून महापूजा केली जाते. या पूजेचा मान पाटील (गलगले) यांच्याकडे आहे. दुपारी १२ वाजता रेणुका मंदिरातील कोतवालास सबिना घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा काढली जाते. त्यानंतर आरती होऊन नैवेद्य दाखवला जातो. तसेच भक्त मंडळाकडून रात्री देवीच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेत निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत यात्रेकरूंना आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्याबरोबरच ग्रामपंचायतीकडूननही यात्रेची तयारी केली आहे. यात्रेत भाविक-भक्तांनी कोविड प्रतिबंधक नियम पाळावेत, असे यात्रा कमिटी व पाटील (गलगले) परिवाराकडून कळविण्यात आले आहे.हे पण वाचा-
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

सोशल मीडियावरील ओळखीतून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग, धमक्या आणि पळवून नेण्याचा प्रयत्न!
पाषाणमध्ये धमकावून ४० हजारांची लूट, तर बिबवेवाडीत उपाहारगृहातून तब्बल २.३० लाखांची रोकड चोरी!
‘The Bollywood Beat’ बॉक्स ऑफिसचे विक्रम, सुपरस्टार्सचे आणि मोठ्या चित्रपटांच्या धमाकेदार अपडेट्स!
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




