Arun Gandhi : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kolhapur News : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू आणि तुषार गांधी यांचे वडील अरुण गांधी यांचे दु:खद निधन झाले आहे. मंगळवारी कोल्हापूरात पहाटे साडेपाच वाजता अरुण गांधींची प्राण ज्योत मावळली. हणबरवाडी इथल्या अवनी संस्थेत त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अरुण गांधी यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखक आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते अरुण गांधी यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातील हणबरवाडी परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुत्र तुषार गांधी यांनी याबाबत माहिती दिली.

१४ एप्रिल १९३४ रोजी डर्बन येथे अरुण गांधी यांचा जन्म झाला. ते मणीलाल गांधी आणि सुशीला मश्रुवाला यांचे पुत्र होते. अरुण गांधींचे आजोबा देखील समाजसेवक होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अरुण गांधी यांनी देखील समाजसेवेस सुरूवात केली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *