ईडी ,पिडी टळू दे रे महाराजा! म्हणत राष्ट्रवादीकडून केंद्राच्या विरोधात होळी साजरी

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज गुरुवारी (ता.१७) होळी साजरी केली. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांवर सुड घेणाऱ्या असुरी शक्तींची ही होळी आहे, असं सांगत राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा दिल्या. बेरोजगारी, महागाई, पेट्रोल वाढ या सगळ्याच्या विरोधात राष्ट्रवादीने होळी साजरी केली आहे. ED, पिडी टळू दे रे महाराजा, म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने होळी साजरी केली. या प्रसंगी होलिकाचे दहन करण्यात आले. आज होळी साजरी केली जात आहे. तब्बल दोन वर्षानंतर लोक घराबाहेर निघून सण साजरा करित आहेत. देशभरात राजकीय नेतेही होळी साजरा करण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *