
कल्याण : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस दोन दिवसांपासून एक संतापजनक प्रकार सुरू आहे.. एक विकृत प्रवासी लपूनछपून महिला प्रवाशांचे व्हिडीओ काढत होता. त्याला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. ट्रेन कल्याण स्थानकात पोहोचल्यावर प्रवाशांनी या विकृत व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले आहे. आरोपी मदरशामधील शिक्षक आहे. लोहमार्ग पोलिसांनी मोहम्मदवर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांचे व्हिडिओ शूटिंग करून महिलांची छेड काढणारा व्यक्ती प्रवाशांनी रंगेहात पकडून दिला पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. मोहम्मद अश्रफ असे व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून हा व्यक्ती असे प्रकार करत होता. आज व्हिडिओ काढताना रंगेहात पकडला. त्यानंतर प्रवाशांनी त्याला चांगला चोप दिला.
धावत्या ट्रेनमध्ये हा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांनी लगेच टिसीच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यानंतर टिसीने कल्याण पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले होते. स्थानकावर गाडी येताच कल्याण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवाशांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार कर्जत येथे घडल्याने हा गुन्हा व आरोपी कर्जत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मागील दोन ते तीन दिवसापासून हा इसम या गाडीने ये जा करत सहप्रवासी महिलांचे व्हिडिओ तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
या आधी विमान प्रवासात सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची घटना समोर आली होती. दारूच्या नशेत असलेल्या प्रवाश्याने सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका करून तिच्याशी गैरवर्तनही केलं होते. दरम्यान आता रेल्वे प्रवासातही अशीच घटना समोर आल्यानं प्रवासातल्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. रेल्वेमधून अनेक सामान्य नागरिक दररोज प्रवास करतात. बरेचदा काही महिला प्रवासी एकट्यानंही प्रवास करतात. अशा नागरिकांचा त्रास प्रवाशांना होऊ शकतो. याबाबत रेल्वेकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

