
पुणे : नव्वदच्या दशकात पुणे हादरवणाऱ्या राठी हत्याकांडातील आरोपीची मुक्तता करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२७ मार्च) दिले. गुन्हा घडला त्या वेळी आरोपी अल्पवयीन असल्याचा दाखला देत न्यायालयाने आरोपींची मुक्तता केली. नारायण चेतनराम चौधरी असे मुक्तता करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पौड रस्त्यावरील शीला विहार कॉलनीमध्ये २६ ऑगस्ट १९९४ ला घडलेल्या या हत्याकांडामध्ये एका गर्भवती महिलेसह सात जणांचे निर्घृण खून करण्यात आले.
त्यामध्ये राजू राजपुरोहित, जितू नैनसिंग गेहलोत,नारायण चेताराम चौधरी (सर्व रा. राजस्थान) आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी मुख्य आरोपी राजपुरोहित खटल्यात माफीचा साक्षीदार बनला. त्यामुळे त्याची गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली होती. अन्य दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याबाबत त्यांनी राष्ट्रपतींकडे दया याचना केली होती. २०१६ मध्ये या दोघांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेमध्ये रूपांतर झाले. तो गेली २८ वर्ष कारागृहात शिक्षा भोगत होता.
याबाबत त्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली होती. गुन्हा घडला त्या वेळी आपण अल्पवयीन असल्याने मुक्तता व्हावी असे त्याने त्यामध्ये नमूद केले होते. सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी सत्र न्यायालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. गेहलोत याने राजस्थानमधील त्याच्या शाळेतील जन्म दाखला नोंदीचा पुरावा न्यायालयात सादर केला होता. मे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांचा समावेश असलेल्या सुट्टीतील खंडपीठाने नारायण चौधरी याने शाळेतील जन्मनोंदीचा सादर केलेले पुरावे वस्तुनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, के.एम जोसेफ आणि हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने नारायण चौधरी याचा खुनाच्या गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा मान्य करून त्याची कारागृहातून सुटका करण्याचे आदेश दिले.
सून्न करणारे हत्याकांड
पौड रस्त्यावरील शीला विहार कॉलनीत २६ ऑगस्ट १९९४ ला भरदिवसा झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण पुणे शहर नव्हे, तर राज्यात खळबळ उडाली होती. मिठाईच्या दुकानात पगारवाढ न केल्याच्या कारणावरून मालक केसरीमल राठी यांच्या अपहरणाचा कट आरोपींनी रचला होता. तो फसल्यानंतर राठी हत्याकांडात कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. केसरीमल राठी यांच्या पत्नी मीराबाई (वय ५०), मुलगी प्रीती (वय २१), हेमलता नावंदर (वय २४), सून नीता (वय २५), नातू प्रतीक (वय दीड वर्ष), चिराग (वय ४) आणि मोलकरीण सत्यभामा सुतार (वय ४५) यांचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर पुणे शहरात घबराट उडाली होती.
राठी हत्याकांड प्रकरणाचा तपास
तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त अरुण कारखानीस, शरद अवस्थी, अशोक चांदगुडे, पोलीस निरीक्षक ए. एस. शेख. सुरेंद्र पाटील, दारा इराणी, विक्रम पवार यांच्या नेतृत्वाखालील सात पथकांनी रात्रंदिवस तपास करून तीन आरोपीना राजस्थानमधील चुरु जिल्ह्यात असलेल्या जालबसर गाव आणि परिसरातून अटक केली होती. राठी हत्याकांड प्रकरणी तीन आरोपींना अटक झाल्यावर तपासानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. राजूने आपल्या पापाचे प्रायश्चित्त तसेच फासावर न जाण्यासाठी संपूर्ण घटनेचा कबुलीजबाब देण्यास तयार असल्याचे पत्र तत्कालीन पोलीस आयुक्त ग्यानचंद वर्मा यांना पाठविले. त्यानंतर त्यांनी आणि न्यायदंडाधिकाऱ्यांनी राजूच्या भूमिकेची खातरजमा केली. १८ डिसेंबर १९९५ रोजी त्याने कबुलीजबाब नोंदविला. त्यानुसार राठी कुटुंबीयांचे हत्याकांड आणि चोरीची घटना उघडकीस आणण्यासाठी राजूला माफीचा साक्षीदार करण्यात आले. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील ज्येष्ठ सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलेला पुण्यातील हा पहिला खटला ठरला. तकालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एन. पाताळे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले होते. सरकार पक्षाकडून या खटल्यात एकूण ६६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
शहर
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- मुंबई: मुसळधार पावसासाठी २ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? हवामान विभागाचा अंदाज. मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा!
- मुंबई: मीरा रोडवर विचित्र अपघात: पार्क केलेल्या कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
महाराष्ट्र
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- मुंबई: मुसळधार पावसासाठी २ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार? हवामान विभागाचा अंदाज. मान्सून महाराष्ट्रात दाखल, पण दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा!
- मुंबई: मीरा रोडवर विचित्र अपघात: पार्क केलेल्या कारमधील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हा
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल























Subscribe to my channel




