
Post Office Froud : उप पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या गुंतवणुकदारांनी केलेली गुंतवणुक ही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये केलेली आहे, असे सांगून त्यावर परस्पर कमिशन घेऊन पोस्ट खात्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 23 लाख 76 हजार 215 रुपयांची पोस्ट खात्याची फसवणूक केली असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नानारसाहेब वीर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दिघी उपपोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी , क्लार्क भगवान श्रीरंग नाईक, धानोरी पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे, धानोरी पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी, रमेश गुलाब भोसले , विलास एस देठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली तर त्यामध्ये 2 टक्के कमिशन पोस्ट मास्तरांना मिळते. या नियमाचा गैरफायदा घेऊन दिघी पोस्ट कार्यालयात 16 जुलै 2018 ते 21ऑगस्ट 2020 दरम्यान दिघी उपपोस्ट ऑफिसमध्ये 274 गुंतवणुकदारांनी 9 कोटी 62लाख 98 हजार रुपयांची गुंतवणूक पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केली होती. त्यांना धानोरी शाखा पोस्ट ऑफिस येथे खाते उघडण्यास लावल्याचे दाखविले. त्या रक्कमेपोटी 18 लाख 35 हजार 115 रुपये धानोरी पोस्ट ऑफिसास दिले. ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोस्ट खात्याची खातेदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बनावट सह्या करुन पोस्टाची फसवणूक केली. त्याप्रमाणे डंकर्क लाईनमध्ये आलेल्या 59 गुंतवणुकदारांची एकूण 2 कोटी 47लाख 60हजार रुपये रक्कम स्वीकारुन त्यांचे बीआरडी पोस्ट ऑफिसामध्ये टीडी खाते उघडण्यास लावून त्यांच्या कमिशनपोटी 4 लाख 95 हजार 200 रुपये स्वीकारले. त्यातील 75 टक्के रक्कम ज्योतीराम माळी याने घेऊन 25 टक्के रक्कम बीआरडी शाखा डाकपाल रमेश भोसले यांना दिली.
19 खातेदारांची फसवणूक
आरोपींनी विमाननगर येथील उप पोस्ट ऑफिसात उप डाकपाल म्हणून कार्यरत असताना उप पोस्ट ऑफिसात त्यांनी आवर्ती ठेवबात आणि सुकन्या समृध्दी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी काऊंटरवर आल्यानंतर त्यांची रक्कम स्विकारुन खातेधारकांकडे असलेल्या पासबुकवर रक्कम स्विकारण्याबाबत तारखेचे शिक्के मारुन शासकीय फिनाकल प्रणालीमध्ये त्यांची नोंद घेण्याची जबाबदारी विश्वासाने दिली असताना आरोपीने 19 खातेदारांनी आवर्ती ठेवखाते TD आणि सुकन्या समृध्दी योजना या योजने अंतर्गत खात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली एकूण 45 हजारांची रक्कम सरकारी हिशोबामध्ये जमा न करता आर्थिक गैरव्यवहार करुन डाकखात्याची आणि 19खातेदारांची फसवणूक केली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


