
पुणे - वाहतूक सेवा पुरविल्याबद्दलचे सुमारे २०० कोटी रुपये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘पीएमपी’ला तातडीने द्यावेत, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईतील बैठकीत दिला.
‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रातील ‘पीएमपी’च्या वाहतुकीबाबत मुंबईत बैठक झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते. ‘पीएमपी’कडून ‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रात ४७७ बसद्वारे दररोज वाहतुकीची सेवा पुरविली जाते. त्यासाठी दरमहा १८८ कोटी रुपयांचा खर्च पीएमपीला येतो. २०२१-२२ या वर्षांचे पैसे मिळावेत, यासाठी पीएमपीकडून पीएमआरडीएकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता.
अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावर आता यावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे ‘पीएमपी’कडून पीएमआरडीए क्षेत्रात बस वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, दोन्ही महापालिकांनी ‘पीएमपी’चा पुढील वर्षांत होणारा संभाव्य तोटा लक्षात घेऊन आपापल्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी शिरोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर पूर्ण आढावा घेऊन चर्चा करण्याचे ठरले. दरम्यान, ‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रात तीन ठिकाणी ‘पीएमपी’चे डेपो सुरू होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात बससेवेचा विस्तारही होणार आहे.
पीएमपी’च्या बससेवेचा फायदा केवळ पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांतील नागरिकांना होतो असे नाही, तर पुण्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा होतो. मात्र ग्रामीण भागांतील पीएमपीची सेवा तोट्यात आहे.
तेव्हा पीएमपीच्या तिकिटाची दरवाढ करण्याचा विचार केला गेला. पण तो आम्हाला मान्य नव्हता. त्यामुळे ‘पीएमपी’ची तूट भरून काढण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांप्रमाणे आता ‘पीएमआरडीए’सुद्धा आपले योगदान देणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएच्या आयुक्तांना पीएमपीच्या संचालक मंडळात स्थान दिले जाईल. त्यामुळे पीएमपीच्या तिकिटांत भाडेवाढ करण्याची गरज भासणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
‘पीएमपी’च्या संचालक मंडळात नियुक्ती
‘पीएमपी’च्या संचालक मंडळात ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांची पदसिद्ध नियुक्ती करण्याचाही निर्णय या बैठकीत झाला. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर लगेचच संचालक म्हणून पीएमआरडीए आयुक्त काम करू शकतील. त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

