Weather Update : ऐन थंडीत राज्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली माहिती

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. 27) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाजहवामान विभागाने वर्तवला होता. सध्या संपूर्ण राज्यात पुन्हा थंडीचा कडाका जाणवत आहे.

अशातच आता 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे.पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *