Dhanbad : झारखंड हादरलं! धनबादमध्ये मोठा बॉम्ब स्फोट; दुकानाजवळ ब्लास्ट झाल्याने ४ गंभीर जखमी

Dhanbad News : झारखंडच्या धनबादमधून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. धनबाद येथील तोपचांची स्थित बाजारात बॉम्बचा मोठा स्फोट झाला आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरील पोलीस आणि नागरिकांनी गंभीर जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती दुचाकीच्या डिक्कीमध्ये बॉम्ब घेऊन बाजारात भाजी घ्यायला आला होता. यावेळीच बाजारात बॉम्ब स्फोट झाला आहे. या बॉम्ब स्फोटमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सर्व जखमी व्यक्तींना शहीद निर्मल महतो मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .

धनबाद बॉम्ब स्फोटच्या घटनेवर महिला म्हणाली, ' मी तोपचांची बाजारात भाजी विकत होती. त्यावेळी एक व्यक्ती दुचाकीने आला. त्याने दुचाकीची डिक्की उघडली अन् त्याचवेळी बाजारात बॉम्ब स्पोट झाला'.

दरम्यान, पोलीस दुचाकीस्वाराची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची सांगण्यात येत आहे. या जखमीमध्ये एका महिलेचा सामावेश असून त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दुचाकीस्वाराच्या डिक्की उघडल्यानंतर ब्लास्ट झाला, त्याची चौकशी तब्येतीत सुधारणा झाल्यावर पोलिसांकडून करण्यात येणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *