सोलापूरमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

सोलापूरः सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीत एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बार्शी तालुक्यात हा फटाक्यांचा कारखाना आहे. आज या कारखान्यात स्फोट झाला. तब्बल चार एकरात पसरलेल्या कारखान्यात ४० जण काम करीत होते. आज स्फोट होताच परिसतराली गावकरी तिथे धावले. या घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक सांगत आहेत. तर दहापेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. 'साम टीव्ही'ने याबाबत वृत्त दिले आहे.

बार्शीच्या या फटाका कारखान्यात बांगरवाडी, वालवाड, उकडगाव येथील लोक काम करतात. आज अचानक कारखान्याला स्फोट झाला. परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने धावत जावून बचावकार्य केलं. जखमींना वेळेत उपचार मिळाले नसते तर आणखी अनर्थ झाला असता.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *