
पुणे - कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी रविवारी (ता.1) येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. पुणे पोलिस दलातील सहा हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी, राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती दलाच्या पथकांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबरोबरच स्पॉटर किट व्हॅन, व्हिडीओ कॅमेरा व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे "वॉच' ठेवला जाणार आहे.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने अनुयायी येतात. तीन वर्षांपासून विजयस्तंभाच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने यावर्षीही पुणे शहर पोलिस, ग्रामीण पोलिस दलाकडून विजयस्तंभाच्या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदिप कर्णिक यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठका घेऊन बंदोबस्त व सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना यावर भर देण्यात आला होता.
विजयस्तंभाच्या ठिकाणी सातत्याने भेटी देऊन मार्गदर्शन व आवश्यक सुचनाही त्यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. रितेश कुमार व कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली विजयस्तंभ अभिवादन बंदोबस्ताची रंगीत तालीम नुकतीच घेण्यात आली. दरम्यान, विजयस्तंभ परिसरात गोपनीय यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकुर समाजमाध्यमांवर प्रसारीत करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विजयस्तंभ परिसरात कोणीही हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांनी दिलेल्या आहेत.
अशी आहे सुरक्षिततेची सद्यस्थिती
- सीसीटीव्ही कॅमेरे - 240
- स्पॉटर किट व्हॅन - 05
- व्हिडीओ कॅमेरा
- ड्रोन कॅमेरा
पोलिस बंदोबस्त
- अतिरीक्त पोलिस आयुक्त - 04
- पोलिस उपायुक्त - 15
- सहाय्यक पोलिस उपायुक्त - 21
- पोलिस निरीक्षक - 90
- सहाय्यक पोलिस निरीक्षक - 250
- पोलिस कर्मचारी - 4 हजार
- गृहरक्षक दल - 1 हजार
- बीडीडीएस पथके - 11
- क्युआरटी पथके - 6
- आरसीपी स्ट्रायकींग - 05
- एसआरपीएफ - 8 कंपनी
आक्षेपार्ह माहिती मिळाल्यास इथे साधा संपर्क
- 02026126296
- व्हॉटसअप क्रमांक 8975953100
- पोलिस नियंत्रण कक्ष - 112
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


