
संगमनेर : छोट्या-मोठ्या चोर्या, मोटार सायकल लांबविण्याचे प्रकार व गंठण चोरीच्या घटनांनी आधीच हैराण असलेल्या संगमनेरात आता सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटे शहरालगतच्या सुकेवाडीत हे सिद्ध करणारा प्रकार घडला असून सशस्त्र दरोडेखोरांनी उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीवर हल्ला चढवित चाकू, लोखंडी टामी, पाईप अशा शस्त्रांचा धाक दाखवित तीन घरांमधून 15 तोळे वजनाचे व आणि सुमारे साडेतीन लाख रुपये सरकारी मूल्य असलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह दीड लाख रुपयांची रक्कम घेवून दरोडेखोरांनी पलायन केले. या घटनेने तालुक्यात दरोड्यांचे सत्र सुरु झाल्याचे बोलले जात असून नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज पहाटे शहरालगतच्या सुकेवाडीतील सुकेवाडी-कारखाना रस्त्यावरील उपसरपंच सुभाष कुटे यांच्या वस्तीसह पावबाकी परिसरात घडली. या परिसरात पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत कुटे वस्तीवरील एका रेषेत असलेल्या आठातील सात घरांना बाहेरुन कड्या लावून उत्तमराव कुटे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी दरोडेखोरांनी कुटे यांच्या मानेला चाकू लावून ऐवज काढून देण्याचा दम भरला. त्यामुळे कुटे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडील दहा तोळ्यांहून अधिक वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास सव्वा लाखांची रक्कम ओरबाडून घेतली.
यावेळी या दरोडेखोरांनी कपाटातील ऐवजासह महिला व मुलांच्या अंगावरील दागिनेही ओरबाडून घेतले. हा गदारोळ सुरु असतांना आसपासच्या घरातील नागरीकही जागे झाले. मात्र दरोडेखोरांनी सगळ्यांच्या घराला बाहेरुन कड्या लावल्याने कोणालाही मदतीसाठी येता आले नाही. जवळपास अर्धातास या वस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरु होता. या दरम्यान त्यांनी लष्करात सेवेला असलेल्या दातीर या जवानाच्या घरावरही दरोडा घातला, यावेळी जवान दातीर हे कर्तव्यावर गेलेले होते तर त्यांच्या घरात केवळ त्यांची पत्नी व मुले होती. याच वस्तीवरील एका म्हातारीकडे शेळ्या विकून आलेले पैसेही दरोडेखोरांनी ओरबाडले.
हा सगळा प्रकार सुरु असतांना सुकेवाडीचे उपसरपंच सुभाष कुटे यांनी आपल्या खिडकीतून चोरऽ.. चोरऽ अशी ओरड करण्यास सुरुवात केल्याने दरोडेखोरांच्या टोळीतील एका साडेसहा फूटांहून अधिक उंच असलेल्या चोरट्याने आपल्या हातातील लोखंडी पहार उगारुन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. येथून पुढे जाताना चोरट्यांनी पेशाने वाहनचालक असलेल्या सुनील नाईकवाडी यांच्या घरावरही दरोडा घालून सोन्याचे दागिने व रोकड लुटून नेली. जवळपास अर्धातास सुरु असलेल्या या प्रकारानंतर दरोडेखोर निघून गेले. त्यानंतर इतरांना फोन करुन बोलावून घेत बाहेरुन लावलेल्या कड्या उघडण्यात आल्या.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्वानपथक व ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. दरोडेखोर जेव्हा कुटे वस्तीवर आले त्यावेळी ते सर्वजण तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. याबाबत पोलिसांनी सुनील नाईकवाडी यांना फिर्यादी करुन त्यांच्याच तक्रारीत अन्य दरोड्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार साडेतीन ताळे वजनाचे गंठण, दीड तोळ्याचा रत्नहार असा 1 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल, पाच तोळे वजनाचे गंठण, एक तोळ्याची कर्णफुले, दीड तोळ्याची चेन व मंगळसूत्र असा 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल, दीड व अर्धा तोळ्याची पोत, अर्धा तोळ्याचा हार, दोन हजारांचा मोबाईल व 1 लाख 55 हजार रुपये रोख असा एकूण 4 लाख 92 हजारांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लांबविला आहे. या घटनेने शहरासह ग्रामीण भागात दरोडेखोरांची दहशत निर्माण झाली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


