मथुरा : मुलगी न सांगता घराबाहेर गेल्याने वडिलांची तळपायाची आग मस्तकात, घरी येताच गोळी घातली अन् मृतदेह गुंडाळला आणि एका बॅगेत भरला.; पोलीसही चक्रावले

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात यमुना एक्स्प्रेस-वेवर ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मृतदेहाचं गू़ढ अखेर उकललं आहे. पोलिसांना बॅगेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता. तपासादरम्यान तरुणीच्या वडिलांनीच मुलीचा गोळी झाडून खून केल्याचं समोर आलं आहे. खून केल्यानंतर त्यांनी मृतदेह बॅगेत भरुन फेकून दिला होता.

आयुषी यादव असं या तरुणीचं नाव आहे. दिल्लीमधील बदरपूर येथीत ती निवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषी आपल्या वडिलांना काही न सांगताच घराबाहेर गेली होती. यामुळे वडील नितेश यादव संतापले होते. आयुषी घरी येताच त्यांनी गोळी घालून तिचा खून केला. यानंतर त्यांनी प्लास्टिकमध्ये तिचा मृतदेह गुंडाळला आणि एका बॅगेत भरला. उत्तर प्रदेशात यमुना एक्स्प्रेस-वेवर त्यांनी हा मृतदेह फेकून दिला होता.

शुक्रवारी पोलिसांना हा मृतदेह सापडला होता. पोलिसांसमोर मृजदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान होतं. पोलिसांनी जवळच्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना घटनेची माहिती दिली होती. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *