
नाशिक : मद्यधुंद अवस्थेतील चालकाने सुसाट मोटार दामटत उपनगर ते वडाळा, पाथर्डी फाटा ते चांडक सर्कल मार्गांवर अक्षरश: धुडगूस घालत रस्त्यावरील अनेक वाहनधारकांना उडविले. या मोटारीचा अन्य वाहनधारकांनी पाठलाग केला. परंतु, त्याने कुणाला न जुमानता समोर येईल त्याला उडविण्याचे सत्र सुरूच ठेवले. अगदी टायर फुटल्यानंतरही तो वाहन थांबविण्यास तयार नव्हता. अखेर चांडक सर्कल चौकात जमावाने त्याला पकडले. या थरारात जखमी झालेल्या दोन जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
साहेबराव निकम असे या संशयित चालकाचे नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास हे थरार नाट्य घडले. त्याची सुरूवात नाशिकरोडच्या उपनगर भागातून झाली. मद्यपी चालक भरधाव नाशिक-पुणे महामार्गावरून मार्गस्थ झाला. अशोका मार्ग, वडाळा गाव या अतिशय वर्दळीच्या भागात सुसाटपणे त्याने काही वाहनधारक आणि पादचाऱ्यांना उडविले. वाहतूक पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने त्यांनाही जुमानले नाही. त्यांनाही उडविल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. काही चौकात जमाव जमला. अनेक वाहनधारकांनी सुसाट निघालेल्या मोटारीचा पाठलाग सुरू केला. मद्यपी चालक मुंबई-आग्रा महामार्गाकडे त्याच वेगात पाथर्डी आणि नंतर चांडक सर्कल चौकात गेल्याचे सांगितले जाते. मार्गात अनेक ठिकाणी त्याची मोटार रोखण्याचे प्रयत्न झाले. पण संबंधिताने त्यांनाही उडवून पळ काढला. वेग इतका होता की, त्या मोटारीचे टायर फुटले. पण, संशयिताने वाहन थांबविले नाही. या नाट्याचा शेवट तिडके कॉलनीतील चांडक सर्कल चौकात झाला. जमावाने या ठिकाणी मद्यपी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
मद्यपी चालकाच्या थरार नाट्यात दोन दुचाकीस्वार जखमी झाले. त्यातील एकाच्या पायावरून मोटार गेली. एक जखमी व्यक्ती सिन्नर येथील शिक्षक असल्याचे कळते. या घटनाक्रमात दोन पोलीसही जखमी झाल्याचे सांगितले जाते. परंतु, त्यास यंत्रणेकडून दुजोरा मिळाला नाही. वर्दळीच्या रस्त्यांवर मद्यपी चालकाने अतिशय निर्दयीपणे मोटार दामटली. अन्य वाहने, पादचारी यांचा विचार केला नाही, अशी प्रतिक्रिया जमावाकडून उमटत होती. यात अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. संशयित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




