
पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. सदर पूल एक व दोन ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. हा पूल पाडण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सदर पूल पाडण्यासाठी दुपारी ४ वाजल्यापासून १४४ कलम लागू करण्यात येणार आहे, अशी महत्वाची माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
चांदणी चौकातील पूल स्पोटकांद्वारे पाडण्यात येणार आहे. या कामाच्यावेळी तसेच तेथील राडारोडा उचलण्याची कार्यवाही होईपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच पूल पाडण्यासाठी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चांदणी चौक परिसरात सायंकाळी कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. तसेच ११ वाजण्याच्या आधी सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात येणार आहे.
सर्व बाबी व्यवस्थित असेल तर पूल आधीच स्फोटकाद्वारे पाडण्यात येईल. रात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास पूल पाडला जाईल. सकाळी लवकरात लवकर रस्ता सुरू होण्याचे पूर्ण प्रयत्न केले जातील, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
'चांदणी चौकातील पूल पाडण्यासाठी दोन्ही रस्त्याची वाहतूक रात्री ८ नंतर थांबवण्याचे काम सुरू होईल. सांयकाळी ६ वाजल्यानंतर परिसर निर्मनुष्य करायला सुरुवात होईल. लवकरात लवकर हा पूल पाडून नागरिकांना गैरसोय होणार नाही हा प्रयत्न आहे. सकाळी ८ वाजता वाहतूक सुरू होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती देखील डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.
• साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतूकीस बंदी करण्यात येणार आहे.
• मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतूकीस बंदी राहील.
वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग
मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरीता
• मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
• वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
• राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
• खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग.
शहर
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
महाराष्ट्र
- कोल्हापुरात पाणीबाणी! १० नद्यांवर पुन्हा 'उपसाबंदी' लागू; ऐन खरीप हंगामात शेतकरी संकटात.
- अवैध वाळू उपशाची तक्रार केल्याचा राग; शिवसेना नेत्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला, पत्नीलाही दिली गंभीर धमकी!
- पावसाच्या विलंबामुळे सोलापूर बाजारात 'कर्नाटकातील हापूस'ची चलती! रत्नागिरी हापूसचे दर गगनाला भिडले.
- मुंबईत मनसे आक्रमक! ओला-उबेर-रॅपिडोच्या ४०० हून अधिक वाहनांवर कारवाई, चालकांची कसून तपासणी.
गुन्हा
- पुणे: हिरे व्यापाऱ्याचे 'मृत्यू'चे नाटक उघड; पत्नीला केलेल्या एका फोनमुळे फुटलं बिंग!
- 'ॲक्शन मोड'मध्ये तुकाराम मुंढे! बनावट दूध आणि भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले; राज्यभरात धडक कारवाई.
- पोलिसांवर गोळीबार करून पळालेल्या कुख्यात गुंडाचा खेळ खल्लास; पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ७० गुन्हे असलेल्या आरोपीला बेड्या.
- कल्याण हादरलं! हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ; सासरच्या मंडळींनी केलं चक्क टक्कल.
राजकीय
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
- बंगालमधील राजकीय संघर्ष पेटला! भवानीपूर विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ममता बॅनर्जींचे कलकत्ता उच्च न्यायालयात आव्हान.
- नवी मुंबईत युतीमधील संघर्ष पेटला! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून गणेश नाईकांच्या ताफ्याला रोखण्याचा प्रयत्न; राजकीय वातावरण तापले
इतर
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
- एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितले वेदनांचे खरे कारण.
- आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही 'कफ सिरप'; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
- आजचे राशिभविष्य १६ जून २०२६: आज कोणावर होईल हनुमानाची कृपा? वाचा सविस्तर!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गुजरात: भीषण अपघात! वडोदरा-हालोल मार्गावर बस आणि ट्रकची जोरदार धडक; १० प्रवाशांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- राजौरीतील सीमेवर भीषण स्फोट; नियमित गस्तीदरम्यान भूसुरुंग सक्रिय झाल्याने ४ जवान जखमी.
- धक्कादायक! ऑनलाईन गेमच्या नादात बँकेचे ४१ लाख लंपास; महिला कॅशियरची ऐशोआरामासाठी उधळपट्टी, अखेर बेड्या!























Subscribe to my channel



