
पुणे महामेट्रोककडून खडकवासला ते खराडी या 25 किलोमीटर अंतराचा आराखडा महापालिकेकडे सादर केला आहे. या मार्गासाठी 8 हजार 565 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली आहे. या आराखड्यात खडकवासला ते स्वारगेट-हडपसर आणि खराडी असा हा स्वतंत्र मार्ग असणार आहे, अशी माहिती महामेट्रोने दिली आहे. या मार्गावर किमान 22 स्थानकं असणार आहे.
खडकवासला-सिंहगड रस्ता-स्वारगेट-शंकरशेठ रस्ता-राम मनोहर लोहिया उद्यान-मुंढवा चौक-खराडी असा मार्ग असेल. संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड होणार आहे. हा मार्ग मुख्य सिंहगड रस्त्याने सारसबागेसमोरून गणेश कलाक्रीडा मंचासमोरून जेधे चौक, शंकरशेठ रस्त्याने पुढे जाईल.
पुणे मेट्रोने दुसऱ्या टप्प्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) नुकताच महापालिकेसमोर सादर केला. मेट्रोचे अधिकारी आणि पुणे महानगरपालिका (PMC) अधिकाऱ्यांनी प्राथमिक चर्चा केली आणि येत्या आठवड्यात मेट्रोच्या प्रस्तावित साइट्ससाठी साइटला भेट दिली जाईल, अशी माहिती महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली आहे.
कोणती स्थानकं असणार?
खराडी ते खडकवासला या मार्गावर किमान 22 स्थानकं असणार आहे. खडकवासला, दळवेवाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम पूल, पीएल देशपांडे पार्क, दांडेकर पूल, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे कॅन्टोन्मेंट, रेसकोर्स, फातिमानगर, रामटेकडी, हडपसर, , मगरपट्टा मेन, मगरपट्टा उत्तर, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथ नगर आणि खराडी चौक या ठिकाणी स्थानकं असणार आहे.
लवकरच गरवारे ते डेक्कन मेट्रो धावणार
पुणे मेट्रोने फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत रीच 1 आणि गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशनपर्यंत पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला. या चाचणीला मोठे यश मिळाले. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे दिवाणी न्यायालयाकडे आणि फुगेवाडी येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परत डेक्कन ते गरवारे स्थानकापर्यंत ही ट्रायल पार पडली. त्याचप्रमाणे ते फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानक या टप्प्यावर सुद्धा मेट्रोची ट्रायल झाली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल वेग 15 KMPH होता आणि तो नियोजित प्रमाणे पूर्ण करण्यात आला.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




