T20 WC: खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची पहिली विकेट पडली, कर्णधार-प्रशिक्षकाबाबत लवकरच निर्णय

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाबाबत बरीच चर्चा रंगली होती. ऑस्ट्रेलियाला 3-0 ने मात दिल्याने छाती बेडकीसारखी फुगली होती. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुरूवातीचे दोन सामने जिंकल्याने पार हवेत गेले होते. पण साखळी फेरीतील तिसर्‍या भारतीय संघाने हवा काढली. त्यानंतर सुपर 8 फेरीत जागा मिळवली. पण या फेरीत निराशाजनक कामगिरी केल्याने उपांत्य फेरीपूर्वीच पत्ता कट झाला. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर पीसीबीचा संताप झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता पाकिस्तान संघाची शस्त्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. इतकंच काय तर पाकिस्तान निवड समितीत असलेल्या अलीम दार यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख सदस्य आणि माजी आंतरराष्ट्रीय पंच अलीम दार यांची ऑक्टोबर 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. इतर काही वृत्तांनुसार, पीसीबीनेच अलीम दार यांना या पदावरून काढून टाकल्याचं सांगितलं जात आहे. आता टी20 संघात काही महत्त्वाचे बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. बाबर आझमचं टी20 क्रिकेट करिअर आता संपल्यातच जमा आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीला टी20 संघात जागा मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरं सलमान आघाकडून कर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित चुकलं.. पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना हा श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवायचं होतं. पण तसं झालं नाही. पाकिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकला. हा सामना पाकिस्तानला किमान 64 धावांनी जिंकायचा होता. त्यासाठी पाकिस्तानने 200 पार धावाही केल्या होत्या. पण सुमार गोलंदाजीमुळे पाकिस्तानला श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्यास अपयश आलं. शेवटच्या षटकात 27 धावांची आवश्यकता होता. यावेळी शाहीन आफ्रिदीने 22 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आणि सलग तीन षटकार मारले. त्यामुळे सामना 2 चेंडूत 5 धावा असा आला. पण दोन्ही चेंडू निर्धाव गेले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *