राज्यात सकाळपासूनच धुळवडीची धूम सुरू आहे. अनेकजण कुटुंबासोबत घरातच धुळवड साजरी करताना दिसत आहेत. तर काही जण मित्र आणि नातेवाईकांसोबत धुळवड साजरी करताना दिसत आहे. बीडबधील एक तरुणही मित्रांसोबत धुळवड साजरी करायला काल रात्री निघाला होता. पण रात्रीच्या काळोखात भयंकर असं काही घडेल हे त्याला वाटलंच नव्हतं. कारच्या चालकाचं अचानक कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार चारवेळा पलटी झाली अन् थेट विहिरीच्या कठड्यालाच जाऊन धडकली. यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे बीड शहरावर शोककळा पसरली आहे. धुलीवंदन साजरे करायला निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याने एक तरूण जागीच ठार तर तिघेजण जखमी झाले आहेत. बीड ते शिरूर रोडवर रायमोहा गावाजवळ ही दुर्देवी आणि भीषण घटना घडली. कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धुलीवंदनाचा सण साजरा करायला वॉटर पार्कला जात होता. मध्यरात्री त्यांची गाडी बीड ते शिरूर रस्त्यावरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला पलट्या खात थेट एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा जागीच ठार झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे व अन्य एक जण यामध्ये जखमी झाले. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती. त्या गाडीतील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरू आहेत. असा झाला अपघात व्हेरा आणि थार अशा दोन कार घेऊन हे मित्र निघाले होते. बीडवरून ते शिरूर कासारमार्गे जात होते. पण नागऱ्याचीवाडी येथे आले असता कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार चारवेळा पलटली झाली. कार धाडधाड पलटी झाल्याने कारमधील सर्वांना जबर मार लागला. त्यानंतर ही कार थेट विहिरीच्या कठड्यावर जाऊन आदळली. त्यामुळे कृष्णाला जबर मार लागल्याने त्याने जागीच प्राण सोडल्याचं सांगितलं जातं. या कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एकजण असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. धुळवड दिली नाही म्हणून मारहाण दरम्यान, इचलकरंजी शहरातील जवाहर नगर परिसरामध्ये आज धुळवळीचा सण मोठ्या उत्साहात पार पडत असताना काही ठिकाणी त्याला गालबोट लागले आहे. काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर आज जवाहर नगर परिसरात एक युवक सायकलवरून कामावरून घरी जात असताना धुळवड दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलांनी त्या युवकाला जबर मारहाण केली. इचलकरंजी शहरांमध्ये धूळवाडीचा सण कुठल्या पद्धतीने खेळला जातो आहे हे आता मात्र समजू शकत नाही. गाड्यांची तोडफोड करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ही अल्पवयीन मुले धुळवडीच्या नावाखाली हुल्लडबाजी करत आहेत. त्यांच्या आई-वडिलांवर आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. ज्या व्यक्तीला मारहाण केली आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. जे मारहाण करत आहेत, त्यांचा पोलीस या व्हिडिओच्या माध्यमातून शोध घेत आहेत.
हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

