पुणे : बिल्किस बानो यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मूकनिदर्शने

पुणे : बिल्किस बानो यांच्या समर्थनासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध विभागांतर्फे मूकनिदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी युवती काँग्रेस, महिला काँग्रेस ,अल्पसंख्यांक विभाग, युवक काँग्रेस या सर्व विभागांच्या पदाधिकाऱ्यांनी काळी वस्त्रे परिधान करुन बिल्किस बानो यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत निषेध नोंदवला, तसेच बिल्किस यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूक निदर्शने केली. एक समाज म्हणून पाहताना केवळ बिल्किस बानो कोणत्या धर्माच्या आहेत याकडे न पाहता त्या एक महिला आहेत एवढाच विचार करण्याची गरज आहे.

सर्व धर्म समभाव जपणाऱ्या भारतात बिल्किस यांच्या गुन्हेगारांची सुटका होत असेल तर हे निंदनीय आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या मूकनिदर्शनांच्या निमित्ताने व्यक्त केली. प्रदीप देशमुख, मृणालीनी वाणी, किशोर कांबळे, सुषमा सातपुते, समीर शेख, शमीम पठान, तनवीर शेख, चांद मणूरे, हमिदा शेख, परवीन तांबे, जिशान कुरेशी, बादशाह नायकवडी आणि विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *