
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात चार आरोपींनी अत्याचार केल्याचे संकेत पीडितेने दिले आहेत. पोलिसांकडून मात्र तिघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील चौथा आरोपी कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शनिवारी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडितेची भेट घेतली.
अत्यवस्थ अवस्थेतही पीडितेने पोलीस व डॉक्टरांनाही चार आरोपी असल्याचे संकेत दिले. त्यापैकी दोन आरोपींना अटकही झाली. परंतु हा चौथा आरोपी कोण, हा प्रश्न कायम आहे. हे प्रकरण प्रथम हाताळणारे भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश थोरात म्हणाले, पोलिसांनी पीडितेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तिची स्थिती नाजूक होती. तिला बोलताही येत नव्हते. यावेळी तिने दिलेल्या प्राथमिक माहितीवरून तिघांवर गुन्हा दाखल करत त्यापैकी दोन आरोपींना अटक केली. पीडितेची स्थिती सुधारल्यावर आणखी माहिती कळू शकेल. हा गुन्हा पुढील तपासासाठी गोंदिया पोलिसांकडे वर्ग केला आहे.
गुंतागुंत का वाढली?
पीडिता कन्हाळमोह जंगलातून जात असलेल्या एका दुचाकीचालकाला २ ऑगस्टच्या सकाळी दिसली. त्यानंतर पोलिसांनी तिला प्रथम जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. येथे केवळ मलमपट्टी झाली. पीडितेची गंभीर प्रकृती बघत तिला थेट नागपुरातील मेडिकल रुग्णालयात हलवणे अपेक्षित होते. परंतु त्यापूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयात नेले गेले. येथून नागपुरातील मेडिकलला पोहोचायला संध्याकाळचे ५.३० वाजले. यादरम्यान अधिक रक्तस्त्रावाने पीडितेचा रक्तदाब ६० पर्यंत खाली घसरला. त्यामुळे गुंतागुंत वाढली.
पोलिसांनी २४ तास या प्रकरणात गुन्हाच दाखल केला नाही. या घटनेमध्ये तीन नव्हे तर चार आरोपी होते. मात्र पोलिसांनी आतापर्यंत तीनच आरोपी असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चौथा आरोपी नेमका कोण, हे तिच्याकडूनच स्पष्ट होईल.
– चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप.
‘राजकीय पर्यटना’मुळे संसर्गाचा धोका
पीडितेवर मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूतीरोग विभागाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यातच सध्या करोना व स्वाईन फ्लूचेही रुग्ण वाढले आहे. त्यामुळे या आजाराची बाधा पीडितेला होऊ नये म्हणून तिच्या वॉर्डात कुणालाही प्रवेश नाकारला जाणे गरजेचे आहे. परंतु, विविध राजकीय पक्षांचे नेते तिथे गर्दी करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; महिला आयपीएस अधिकाऱ्यामार्फत चौकशी
नागपूर : या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले.
शहर
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
महाराष्ट्र
- बुलेट ट्रेनचे तिकीट किती असणार? समोर आली मोठी माहिती, देशभरात ८ कॉरिडॉर झाले निश्चित!
- ठाणे: वाढदिवसाचा आनंद ठरला जीवघेणा! ठाण्यात 'थीम केक'मधील धातूच्या पिना ३ वर्षीय चिमुकल्याने गिळल्या; पालकांनो सावधान!
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!



























Subscribe to my channel


