
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते अमित ठाकरे महासंपर्क अभियानासाठी अनेक ठिकाणी भेटी देत आहेत. काल त्यांनी पालघर जिल्ह्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आज ते अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये दौर्यावर आहेत. विशेष म्हणजे यावेळी अमित ठाकरेंनी आपली लक्झरी कार सोडून मुंबईच्या लाईफलाईनने म्हणजे लोकलने प्रवास केला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी अमित ठाकरेंचे लोकलने प्रवास करतानाचे फोटो शेयर केले आहेत.
राज्याच्या राजकारणात सक्रिय होऊ पाहणारे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे सध्या संघटनात्मक बांधणीवर जास्त लक्षं देतायत. त्यासाठी ते राज्यातील अनेक भागांत फिरतायत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्कअभियानासाठी ते त्यांच्या सहकार्यांसोबत लोकलने अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये दाखल झाले. कालच (२१ जुलै) अमित ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. पक्ष पुर्नबांधणी करण्यासाठी तसेच स्थानिक समस्या समजून घेण्यासाठी अमित ठाकरे मंगळवारी आणि बुधवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला होता. यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड व वाडा अशा तालुक्यांमध्ये भेट देऊन, तेथील स्थानिकांच्या समस्या समजून घेण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता.
अमित ठाकरे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष देत आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरु आहे. त्यानुसार आजही ते अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला होता. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत झाली, ज्यात त्यांनी मार्गदर्शन केलं होतं.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




