
पुणे : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष सुनील जाधव याच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी मध्यप्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली. त्यासाठी त्यांना फरार असलेले जॅक उर्फ अमित पंडित आणि हनुमान उर्फ सचिन बिश्नोई यांनी मदत केल्याचे पोलिस तपासात समोर आले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी न्यायालयाला दिली.
या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जाधव याला गुरूवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. युक्तिवादादरम्यान अॅड. फरगडे म्हणाले, मंचर पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना जाधव याने गुन्ह्यातील फिर्यादीकडे ५० हजार रुपयांचा हप्ता मागण्यासाठी नहार, थोरात आणि जाधव याला पाठविले होते. तसेच, जयेश रतिलाल बहिरम आणि गणेश सुरेश तारू यांनी संतोष जाधव याच्या सांगण्यावरून मध्यप्रदेशातून पंधरा पिस्तुले आणली. त्यानंतर, बहिरम याने आपल्याजवळ एक पिस्तूल ठेवत त्यापैकी पाच पिस्तुलांचे साथीदारांना वाटप केले. यामध्ये, रोहित तिटकारे याला दिलेल्या चारपैकी तीन पिस्तुले त्याने वैभव तिटकारे याला दिले होते. ते घराच्या झडतीदरम्यान जप्त करण्यात आले आहे. गुन्हा करण्याच्या एक महिन्याअगोदर आरोपी हे वैभव तिटकारे याच्या घरी एकत्र भेटल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
आरोपीला मध्यप्रदेश येथे नेऊन सखोल तपास करायचा आहे. सध्या फरार असलेले पंडित आणि बिश्नोई यांबाबत जाधव याकडे तपास करायचा आहे. गुन्हा केल्यानंतर जाधव हा राजस्थान, गुजरात येथे वास्तव्याला होता. यादरम्यान त्याला कोणी आश्रय दिला तसेच आर्थिक मदत केली याचा तपास करायचा आहे. जाधव बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याने त्याने टोळीशी संबंधित काही गुन्हे केले आहेत का तसेच जाधव व त्याच्या साथीदाराविरुध्द पुणे ग्रामीण, ठाणे जिल्ह्यात मालमत्तेविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, या स्वरुपाचे त्यांनी इतर ठिकाणी गुन्हे केले आहेत का याचा तपास करायचा आहे. त्यांनी गुन्हेगारीमधून अवैधरित्या कमावलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा शोध घेऊन ती पुराव्याच्या अनुषंगाने जप्त करायची असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. फरगडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत त्याच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ केली.
पूर्ववैमनस्यातून समाजमाध्यमांवर एकमेकांना ठार करण्याच्या धमक्यांचे स्टेटस ठेवल्याच्या कारणातून गेल्या वर्षी एक ऑगस्टला एकलहरे (ता. आंबेगाव) गावातील ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संतोष जाधवसह १४ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
शहर
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
गुन्हा
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
























Subscribe to my channel



