शेखर गुप्ता यांचा कॉलम:ट्रम्पच्या चिथावणीस बळी न पडणे हीच समजदारी‎‎‎‎‎‎‎‎‎

ट्रम्प आपल्या सहकाऱ्यांना आणि मित्रांना अपमानित‎करतात. हे समजून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे, जो‎आपण भारतात ट्रकच्या मागे लिहिलेल्या सुभाषितातून‎समजू शकतो, ‘ऐसा कोई सगा नहीं, जिसको ठगा नही’.‎यात ‘सगा’च्या जागी सहकारी/पार्टनर/मित्र ठेवा आणि‎‘ठगले’च्या जागी ‘अपमानित केले’ हा शब्द ठेवा म्हणजे‎चित्र स्पष्ट होईल. ट्रम्प यांची पद्धत आपल्या मित्रांवर‎उघडपणे आणि उद्धटपणे रुबाब दाखवण्याची राहिली आहे.‎ट्रम्प यांना हे माहीत आहे की, अमेरिकेवरील आपल्या जुन्या‎अवलंबित्वारूपी मजबुरीमुळे त्यांच्यातील कोणीही त्यांचा‎प्रतिकार करू शकत नाही.‎ ते या देशांच्या नेत्यांना कमी लेखत आले आहेत. गेल्या‎आठवड्यात त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी‎तसेच वर्तन केले, जसे ते स्पेन, डेन्मार्क, नॉर्वे, कॅनडा,‎युक्रेन, दक्षिण आफ्रिका, फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि इतर‎अनेक देशांच्या नेत्यांसोबत यापूर्वीच वागले आहेत. स्पेनने‎जेव्हा इराणविरुद्धच्या युद्धात त्यांना आपल्या लष्करी तळांचा‎वापर करण्याची परवानगी दिली नाही, तेव्हा ट्रम्प म्हणाले‎होते की, “अमेरिका कोणाकडेही परवानगी मागत नाही.”‎डेन्मार्क आणि नॉर्वेच्या बाबतीत अनुक्रमे ग्रीनलँड आणि‎नोबेल पुरस्काराचा मुद्दा त्यांच्या आड येतो. दक्षिण‎आफ्रिकेसाठी त्यांनी मस्क यांच्या ‘श्वेत’ नरसंहाराच्या‎विधानाचा वापर केला, तर झेलेन्स्कीबद्दलचे त्यांचे ‘प्रेम’‎आपण पाहतच आहोत. तरीही या गोष्टीने त्यांना इराणच्या‎ड्रोन हल्ल्यांविरुद्ध युक्रेनची मदत घेण्यापासून रोखले नाही.‎ यावरून दोन गोष्टी स्पष्टपणे दिसतात. एक म्हणजे ट्रम्प‎व्यवहारकुशल आहेत. त्यांची आपल्या मित्रांकडून फक्त‎हीच अपेक्षा असते की त्यांनी त्यांच्यासाठी अडचण निर्माण‎करू नये. युरोप त्यांच्यावर इतका अवलंबून आहे की,‎कोणीही तक्रार करू शकत नाही. त्यांनी तुम्हाला कमीपणा‎दिला तरी तो गुपचूप सहन करावा लागतो.‎ परंतु ज्या लोकशाही देशांकडे लोकप्रिय नेते आहेत, ‎‎त्यांच्यासोबत ही पद्धत चालणार नाही. अशा देशांमध्ये भारत ‎‎सर्वात उल्लेखनीय आहे. ट्रम्प यांनी अनेकवेळा असा दावा ‎‎केला आहे की, त्यांनी व्यापार बंद करण्याची धमकी देऊन ‎‎भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले किंवा ‘ऑपरेशन‎सिंदूर’मध्ये किती विमाने पाडली गेली. अर्थात, त्यांनी हे ‎‎सांगितले नाही की पाडलेली विमाने कोणाची होती. ट्रम्प‎हे सूक्ष्म तपशिलात बोलणारे व्यक्ती नाहीत. त्यांच्यावर‎कायम चर्चेत (बातमीत)राहण्याचे वेड स्वार असते.‎एखाद्या दिवशी त्यांना वाटले की आपल्याला प्रसिद्धी ‎‎मिळालेली नाही, तर त्यासाठी ते आपल्या एखाद्या‎मंत्र्याचीच सुट्टी करू शकतात. त्यांनी आपल्या आंतरिक ‎‎सुरक्षामंत्री क्रिस्टी नोएम यांना ज्या प्रकारे बरखास्त केले, ते ‎‎लक्षात घ्या आणि त्यानंतर त्यांनी एखाद्या सामंतशाहीतील ‎‎शासकासारखा उद्धटपणाचा जो अविश्वसनीय संदेश पोस्ट ‎‎केला त्याकडेही लक्ष द्या, ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, आता ‎‎पाहायचे आहे की, त्यांनी क्रिस्टीसाठी जो विशाल फार्म‎तयार केला आहे, त्याचे भविष्य काय असेल.‎ याची पुढची पायरी ही की, जे त्यांच्यावर अवलंबून‎आहेत.अमेरिकेचे सार्वभौम मित्र किंवा त्यांच्या स्वतःच्या‎टीममधील सदस्य.त्यांच्यावर हल्ला करण्यात त्यांना किती‎समाधान मिळते, तर दुसरीकडे, ते शी जिनपिंग यांच्याशी‎सभ्यतेने वागतात, व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन‎यांच्याशी मैत्रीपूर्ण भूमिका ठेवतात. आपल्या या‎कार्यकाळात आतापर्यंत एनएसए मायकल वॉल्जनंतर‎क्रिस्टी नोएम या दुसऱ्या प्रमुख व्यक्ती आहेत, ज्यांची त्यांनी‎हकालपट्टी केली आहे, परंतु त्यांचा जुना रेकॉर्ड पाहिला तर‎असेच म्हटले जाईल की, ‘अजून तुम्ही काहीच पाहिलेले‎नाही’. आपल्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी कॅबिनेट‎दर्जाच्या सात अधिकाऱ्यांना बरखास्त केले होते आणि‎जवळपास तितक्याच लोकांना पद सोडण्यास भाग पाडले‎होते. आजही ते अनेकांवर खार खाऊन आहेत.‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अनेक प्रसंगी ट्रम्प आपल्या लोकांसाठी अशी भाषा‎वापरतात, जी आपल्या संस्कृतीत अपमान मानली जाईल.‎म्हणजेच हे सिद्ध झाले आहे की, ट्रम्प यांचे विशेष ‘प्रेम’ हे‎त्यांच्या स्वतःच्या मित्रांविषयी आणि कॉम्रेड्स विषयीच‎उफाळून येते. म्हणूनच जेव्हा ते तुम्हाला आपला ‘खूप‎चांगला मित्र’ म्हणू लागतात तेव्हा समजून जा की, तुमच्या‎सावध होण्याची वेळ आली आहे. म्हणजेच ते आपल्या‎सुऱ्याला धार लावत आहेत. ते शाळेतील त्या दादासारखे‎आहेत, जो आपल्या टोळीतील सहकाऱ्यांना आठवण‎करून देत असतो की खरा बॉस तोच आहे आणि प्रतिस्पर्धी‎दादांपासून लांब राहा. आता प्रश्न हा आहे की, आपण‎त्यांच्याशी कसे हाताळावे? चिथावणीला बळी न पडता‎मोदींनी ट्रम्प यांच्याशी संबंध निभावण्यात आतापर्यंत‎समजदारीच दाखवली आहे. टॅरिफ (आयात शुल्क)‎लादले गेल्यावरही भारत शांत राहिला. मला असे वाटत‎नाही की जर भाजप विरोधी पक्षात असती, तर त्यांनी काँग्रेस‎सरकारला यासाठी मोकळीक दिली असती, परंतु काँग्रेस‎विरोधी पक्षात असूनही केवळ ट्विट करून समाधानी‎आहे. याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यासाठी ते 10 हजार‎लोकही गोळा करू शकलेले नाहीत.‎ दुसरी समजदारी आपण ही दाखवली की आपण दुसऱ्या‎मित्रांचाही शोध घेत आहोत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे‎कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांचे झालेले उत्साही स्वागत‎होय. अखेर कॅनडा हा अमेरिकेचा जवळचा सहकारी‎राहिला आहे, म्हणूनच तर त्याचा अपमान ‘51 वे राज्य’‎म्हणून केला गेला. असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो‎की मोदींनी इस्रायलचा दौरा का केला? तेही हे माहीत असून‎की इराणसोबतची लढाई कधीही सुरू होऊ शकली असती.‎मी असा अंदाज लावू शकतो की ऑपरेशन सिंदूरनंतर‎लष्कराच्या साठ्यात आलेली घट भरून काढणे आवश्यक‎झाले असेल. पीएसएलव्हीचे सलग दोन प्रक्षेपण अपयशी‎ठरले; लष्करी उपयोगाचे मौल्यवान उपग्रह नष्ट झाले;‎गुप्तचर, देखरेख आणि टेहळणी संसाधने कमकुवत होत‎होती; याशिवाय स्टँड-ऑफ शस्त्रे, ड्रोन आणि सेन्सरची‎गरज वाढली होती. हवाई सुरक्षा मजबूत करणे देखील‎आवश्यक झाले होते. हे देखील स्पष्ट आहे की‎मध्य-पूर्वेच्या बाबतीत भारताने आपली एक बाजू निवडली‎आहे. ती म्हणजे इस्रायल-यूएई युती. हे यूएईचे शासक शेख‎मोहम्मद बिन जाएद यांच्या भारत भेटीला संदर्भ प्रदान‎करते. तिसरी समजदारी ही केली गेली की चीनला‎व्यापाराच्या बाबतीत संधी उपलब्ध करून देण्यात आल्या‎आहेत. तसेही, असुरक्षिततेच्या या वातावरणात भारत‎एकाचवेळी किती लोकांशी पंगा घेऊ शकतो?‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ जेव्हा ट्रम्प तुम्हाला मित्र‎संबोधतात तेव्हा सावध व्हा...‎ट्रम्प यांचे विशेष प्रेम मित्रांप्रतीच उफाळून येते.‎म्हणूनच, जेव्हा ते तुम्हाला आपला ‘खूप चांगला‎मित्र’ म्हणू लागतात, तेव्हा समजून जा की आता‎सावध होण्याची वेळ आली आहे. अशा‎परिस्थितीत ट्रम्प यांच्या चिथावणीला बळी न‎पडता आपण जी समजदारी दाखवली आहे .‎

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *