शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय

जेव्हा तीन महाशक्ती आपल्या ताकदीच्या शिखरावर होत्या, तेव्हा त्यांनी अफगाणिस्तानला दाबण्याचा प्रयत्न केला पण त्या अपयशी ठरल्या. ब्रिटनने 19 व्या शतकाच्या मध्यंतरात, सोव्हिएत युनियनने 1979 नंतर आणि अमेरिकेने 2011 मध्ये 9/11 नंतर. जर पाकिस्तान स्वतःला या तिघांपेक्षा जास्त शक्तिशाली मानत असेल, तर आपण त्याला एवढेच म्हणावे की - करून बघ. आणि मग आपण तमाशा पाहावा. काश्मीरमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या फुटीरतावादामुळे आपल्याला हे माहीत आहे की, अफगाणिस्तान कधीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्करासोबत (दहशतवाद्यांशी) जोडला गेला नाही. जवळपास सर्वच परदेशी दहशतवादी पाकिस्तानी सैनिकांप्रमाणे मुस्लिम पंजाबी बिरादरीचे आहेत. आता पाहा आपण कोणत्या स्थितीत आहोत. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या आत शिरून बॉम्बफेक करत आहे, निष्पाप नागरिक मारले जात आहेत. एकदा तर एकाच कुटुंबातील 18 लोक मारले गेले. तो भाग आणि तिथली लोकसंख्या अशी आहे की, मानवी इतिहासात या सहस्राब्दीच्या सुरुवातीपासूनची सर्वात शक्तिशाली सैन्य शक्ती असलेल्या अमेरिकेसाठीदेखील तिथे अचूक बॉम्बफेक करणे ही एक कल्पनाच होती आणि खूप धोकादायक होती. आपल्या सर्व उपग्रहांच्या, हेरांच्या आणि टेहळणी यंत्रांच्या, ड्रोनच्या आणि अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्रांच्या जोरावर अमेरिका वारंवार मशिदींमध्ये, टोळ्यांच्या मोठ्या आवारात नागरिकांना ठार मारत राहिली किंवा रिकाम्या पडलेल्या गुहा उद्ध्वस्त करत राहिली. या हल्ल्यांमध्ये अफगाणांचे एखादे-दुसरे कमांडर मारले गेले असतील, पण अमेरिकेलाही नेहमी नुकसान सोसावे लागले. अशा प्रत्येक हल्ल्यानंतर तालिबानचा आकार वाढत गेला, बाधित टोळ्यांमधील नवीन लढवय्ये बदला घेण्याच्या शपथा घेत राहिले. जर पाकिस्तानला असे वाटत असेल की तो अमेरिकेपेक्षा जास्त साध्य करू शकतो, तर भारताचा कोणताही समर्थक त्याला एवढेच सांगेल की - पुढे जा आणि आमचे काम सोपे कर. लोकांवर आपत्ती कोसळली तर त्यातून कुणालाही आनंद मिळणार नाही. विशेषतः अफगाणांसाठी तर भारत असे मुळीच इच्छिणार नाही. तिथे कोणतेही शासन असो, ते भारताप्रति नेहमीच सद्भावना ठेवत आले आहेत. अफगाणांचे, विशेषतः अफगाण नागरिकांचे काही नुकसान व्हावे असे आम्हाला अजिबात वाटणार नाही. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, पाकिस्तानने आपल्या उद्धटपणामुळे व अदूरदर्शीपणामुळे स्वतःसाठी दुसरे संकट ओढवून घेतले आहे. केवळ भारतच या उपखंडातील असा देश नाही, ज्याला दोन आघाड्यांवरील जोखमीची चिंता असावी. प्रत्येकाची परिस्थिती नक्कीच वेगवेगळी आहे. भारतासाठी चीन जो आहे, तसा अफगाणिस्तान पाकिस्तानसाठी असू शकत नाही, जरी त्यांच्यात सीमावाद असले तरी. आणि चीन-पाकिस्तानची जशी युती आहे, तशी युती तालिबान आणि भारतामध्ये नाही. सध्याची जी भौगोलिक वास्तविकता आहे, त्यानुसार भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मोठे अंतर आहे, त्यांच्यामध्ये पाकिस्तानचा किंवा पाकिस्तानच्या ताब्यातील प्रदेश येतो. भारतावर जर पाकिस्तानविरुद्ध छुप्या युद्धाचा आरोप केला जात असेल, तर तो इतकाच आहे की भारत अफगाणिस्तानच्या शानदार क्रिकेट संघाला प्रोत्साहन देत आला आहे. तसे पाहता, पाकिस्तानचा रणनीतिक पवित्रा आणि लष्करी तयारी कधीही दोन आघाड्यांच्या दृष्टीने नव्हती, तरीही त्याने स्वतःला या गुंतागुंतीत अडकवून घेतले आहे. तो अशा राष्ट्राशी भिडला आहे, जे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक इस्लामी आणि शुद्धतावादी सुन्नी आहे. पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व कमकुवत आणि कमी बुद्धीचे वाटते. त्याची कूटनीती पूर्णपणे भारत-चीन-अमेरिका केंद्रित आहे आणि तो अफगाणिस्तानला आपला गुलाम मानत आला आहे. त्याच्या सैन्याकडेही विचारांचा अभाव आहे. आपल्या पश्चिम सीमेवरील मोठ्या गोंधळासाठी तो आपला पूर्व शेजारी भारताला दोष देतो. त्याने आपल्या उग्रवादी गटांना धार्मिक विशेषणे लावली आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला (टीटीपी) ‘फितना अल-खवारिज’ या विशेषणाने गौरविले गेले आहे. फितना (बंडखोरी) हा शब्द इस्लामी इतिहासातून आला आहे. पहिला फितना 656 आणि 661 इ.स.मध्ये झाला होता, ज्यामध्ये रशीदून खिलाफत विरुद्ध बंड करण्यात आले होते. तसे, त्या युद्धात इस्लामी अतिरेकी किंवा एक प्रकारे धर्माविरुद्ध बंड करणाऱ्यांच्या रूपात एक तिसरा गटदेखील सामील होता. त्याला खवारिज म्हटले जात असे. पाकिस्तानी फौज किंवा आयएसआय, टीटीपीच्या या नामकरणाच्या बहाण्याने तीच धार्मिक प्रतिमा उभारू इच्छिते. अन्यथा, तुम्ही तुमच्या इस्लामी सैन्याला अशा एखाद्या गटाशी लढण्यासाठी कसे प्रेरित करू शकता, ज्याची मुख्य मागणी ही आहे की संपूर्ण पाकिस्तानमध्ये शरीया लागू करावा? बलुच बंडखोरांविरुद्धच्या प्रचारासाठीही ते इतिहासातील एक नाव उचलतात: ‘फितना अल-हिंद’ (भारताकडून आलेली आपत्ती/विनाश), म्हणजेच असा आरोप की हे पूर्णपणे भारताद्वारे चालवलेले ऑपरेशन आहे. पण हेदेखील भूगोल आणि लोकसंख्येच्या स्वरूपाच्या निकषावर खरे उतरत नाही. बलुच हे केवळ बलुचिस्तानचे नाहीत, ते शेजारील इराण आणि अफगाणिस्तानमधील विशाल ओसाड भागातीलही आहेत. भारत कोणत्याही निकषावर तिथे आपली पोहोच बनवू शकत नाही. पाकिस्तानी प्रशासन पश्चिमेकडे नजर टाकत दशकांपासून मोठी स्वप्ने पाहत आहे. एक तर हे की अफगाणिस्तानमध्ये ते आपली रणनीतिक पकड मजबूत करतील. दुसरे हे की, इराण त्यांचा पक्का इस्लामी सोबती आहे आणि मग ही धारणादेखील की ते सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या पश्चिम आशियाचाच भाग आहेत, विशेषतः अरब मध्य-पूर्वेचा. ही धारणा त्यांना या उपखंडातील ओळखीपासून सुटका मिळवून देते. याचे मोठे कारण हे आहे की, भारताचा दबदबा इतका मोठा आहे की सांस्कृतिक, भाषिक आणि कौटुंबिक संबंध या उपखंडातील ओळखीला भारतीय ओळखीचा समानार्थी बनवतात.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) पाकिस्तानने आपल्या अदूरदर्शीपणामुळे स्वतःसाठी ओढवून घेतलेय दुसरे संकटपाकिस्तानचा रणनीतिक पवित्रा आणि लष्करी तयारी कधीही दोन आघाड्यांच्या दृष्टीने नव्हती, तरीही त्याने अफगाणिस्तानशी युद्ध छेडून स्वतःला गुंतागुंतीत अडकवले आहे. तो अशा राष्ट्राशी भिडला आहे, जे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक इस्लामी आणि शुद्धतावादी सुन्नी आहे.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *