एन. रघुरामन यांचा कॉलम:वृद्धांना घोटाळ्यांपासून वाचवण्याची वेळ आलीय

वृद्धांविरुद्धचे शारीरिक गुन्हे कमी होत आहेत, पण आर्थिक गुन्हे कमी होत नाहीत. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार करणाऱ्या “डिजिटल अरेस्ट’च्या दोन प्रकरणांचा तपास गुरुवारी सीबीआयने हाती घेतला आहे. परंतु “डिजिटल अटके’चा धोका कमी होण्याची चिन्हे नाहीत. खरे तर गुरुवारी बेंगळुरूमध्ये नोंदवलेल्या एका प्रकरणात असे दिसून आले की ते पुन्हा भयावह पद्धतीने परतले आहे. या फसवणुकीचा बळी 74 वर्षीय निवृत्त व्यक्तीस 5 मार्च रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःची ओळख टेलिकॉम अधिकारी म्हणून करून दिली. तिकडून तो सांगतो की तुमच्या मोबाइलचा मनी लाँड्रिंग प्रकरणात गैरवापर झाला आहे. त्यासाठी तुमची चौकशी सुरू आहे. त्यानंतर लगेचच फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल केला व त्यांना कॉलबद्दल कोणालाही सांगू नका असा इशारा दिला. कॉलरने त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या लेटरहेडवर “फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कमिटी ऑर्डर’ असे लिहिलेली कागदपत्रे पाठवली. पीडितेने निर्दोष असल्याचे सांगितले. तेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते संशयित आहेत व फक्त सहकार्य करू शकतात. त्यांनी त्याला पुढील 72 तास कुणाशीही संपर्क न करण्याच्या “स्टँडर्ड प्रोटोकॉल’चे पालन करण्यास सांगितले. त्यांनी असाही दावा केला की नवी मुंबईतील सीबीआय अधिकारी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याच्या घराजवळील फील्ड अधिकारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. 7 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता पीडित व्यक्तीने फोन करणाऱ्याला सांगितले की मला रक्तदाबाची औषधे घेण्यासाठी जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये जायचे आहे. त्यावर ते ठक म्हणाले, आमचा माणूस तुम्हाला औषधी आणून देईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 मिनिटांतच एक अनोळखी त्यांच्या घरी औषध घेऊन आला. यामुळे फसवणूक करणाऱ्यांचा पाळत ठेवण्याचा दावा आणखी बळकट झाला. शेवटी त्यांनी कथित न्यायालयाच्या आदेशानुसार 50 लाख जमा करण्यासाठी वृद्ध व्यक्तीवर दबाव आणला. सीबीआयने हाती घेतलेल्या दुसऱ्या प्रकरणात पीडित व्यक्ती गांधीनगर येथील 74 वर्षीय निवृत्त डॉक्टर आहे. त्यांनाही 19.2 कोटींपेक्षा जास्त फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी पैशांच्या हस्तांतरणाला वैध ठरवण्यासाठी बनावट ईडी लेटरहेडवर “आर्थिक देखरेख’ प्रमाणपत्रेदेखील दिली. अर्थात, फसवणूक करणारे वयाची पर्वा न करता कोणालाही धमकावण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः वृद्धांना लक्ष्य केले जाते. कारण बहुतेक वेळा त्यांच्याकडे बचत असते. ते आयुष्यात कधीही पोलिस स्टेशनला गेलेले नाहीत आणि कोणत्याही कायदेशीर एजन्सीला अगदी स्क्रीनवरदेखील तोंड देण्यास घाबरतात. शिवाय ते एकटे राहतात. फसवणूक करणारे हे लाेक नातवंडे, पोलिस अधिकारी किंवा मेडिकेअर कर्मचारी असल्याचे भासवू शकतात. ते कधी कधी तुमचा संगणक दुरुस्त करण्याचे तुम्हाला श्रीमंत बनवण्याचे किंवा तुमचे कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देतात. स्वतःला किंवा वृद्ध नातेवाइकाला सुरक्षित ठेवण्याचे काही मार्ग येथे आहेत. मर्यादा निश्चित करा : बँकांसह आर्थिक हस्तांतरणांवर मर्यादा निश्चित करा. अज्ञात कॉल व्हॉइसमेलवर जाऊ द्या. कधीही अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका. वेबसाइट तपासण्यासाठी थेट वेब पत्ते टाइप करा आणि पॉप-अप संदेश दिसल्यास लॉगआऊट करा. थांबा आणि विचार करा : खूप लवकर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखणे ही फसवणूक टाळण्यासाठी सर्वात प्रभावी धोरणांपैकी एक आहे. काहीतरी वाईट घडण्यापूर्वी त्वरित कारवाई करण्याचा दबाव ही खबरदारी नाही तर एक कमकुवतपणा आहे. ती तुमची तर्क करण्याची क्षमता कमी करते. दोन विश्वासू लोक असावेत : तुमच्या आयुष्यात किमान दोन लोक विश्वासू हवेत. त्यांना सर्व गोष्टींबद्दल बोलता यायला हवे. तुम्हाला कोणाशीही बोलू नका असे सांगितले जाते तेव्हा स्पष्टपणे सांगा, “मला अटक झाली तरी मी या दोन लोकांशी संपर्क साधल्याशिवाय काहीही करू शकत नाही. फसवणूक करणारे गायब होतील. कारवाई करा : फसवणुकीची त्वरित तक्रार केल्याने अनेकदा घोटाळा होण्यापूर्वीच तो थांबू शकतो.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *