नदाल कोर्टपासून दूर; सहा आठवड्यांचा ब्रेक घेण्याची नामुष्की

स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल दुखापतग्रस्त झाला असून पुढील जवळपास सहा आठवडे त्याला कोर्टपासून बाहेर रहावे लागणार आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील फायनल लढतीत टेलर फ्रिट्ज विरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला काही दिवस कोर्टवर उतरता येणार नाही. मागील वर्षीही दुखापतीमुळे त्याला अनेक स्पर्धेला मुकावे लागले होते. आता पुन्हा त्याच्यावर विश्रांती घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

'कॅडेना सेर'च्या वृत्तानुसार, दुखापतीसंदर्भात नदाल म्हणाला की, ही चांगली बातमी नाही. असं काही होईल असं वाटलं नव्हतं. हंगामाची दमदार सुरुवात झाल्यानंतर निराशा पदरी पडली आहे. आता धैर्याने या संकटाचा सामना करुन कमबॅक करण्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *