लखनऊ : लोकसभेच्या खासदारकीचा सोपवला राजीनामा; अखिलेश यादव होणार यूपीचे विरोधी पक्षनेते

लखनऊ: अखिलेश यादव यांनी आता लोकसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये करहल मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर त्यांनी आता आपल्या खासदारकीचा  राजीनामा सोपवलाआहे माजी मुख्यमंत्री राहिलेले अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच ही विधानसभेची निवडणूक लढवली आहे. ते आझमगढमधून लोकसभेचे खासदार होते. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता ते यूपी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद सांभाळतील अशी शक्यता आहे. त्यांनी आज मंगळवारी दुपारी लोकसभेचे स्पीकर ओम प्रकाश बिर्ला यांना आपला राजीनामा सोपवला आहे. यूपीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाने भाजपसमोर प्रमुख आव्हान उभं केलं होतं. एकूण 403 जागांपैकी समाजवादी पक्षाने 111 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे भाजपला 237 जागांसह यूपीची एकहाती सत्ता प्राप्त झाली आहे. मागच्या निवडणुकीपक्षा समाजवादी पक्षाने नक्कीच चांगली कामगिरी करत भाजपच्या अनेक जागा आपल्या खिशात घातल्या आहेत. कारण, 2017 मध्ये भाजपच्या युतीला एकूण 325 जागा मिळाल्या होत्या. येत्या शुक्रवारी भाजपचे योगी आदित्यनाथ हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.  


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply