राणे पिता-पुत्रांच्या अडचणी वाढणार? दिशा सालियानच्या कुटुंबीयांचं राष्ट्रपतींना पत्र

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपूत्र आमदार नितेश राणे यांनी सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान प्रकरणात वारंवार आरोप केले आहेत. दिशा सालियानचा बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी राणे  पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

आमच्या मुलीच्या मृत्यूबद्दल राजकारण केल्याचा आरोप दिशाच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे नारायण राणे आणि नीतेश राणे या दोघा पिता-पुत्रांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे.

   


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *