यूपीमध्ये पुन्हा ‘योगी’ राज; योगींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

लखनऊ : नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्ता हाती घेणारे ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. गुरुवारी (दि. 24) योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासमोर सरकार स्थापनेचा दावा केला होता. यावेळी योगी यांच्यासह केशव प्रसाद आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

योगींच्या मंत्रिमंडळात यांना मिळाले स्थान योगी यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी योगींसह केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, 9 वेळा आमदार राहिलेले सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय योगींच्या मंत्रीमंडळात सूर्य प्रताप शाही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनीदेखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनादेखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

दरम्यान, योगी यांचा शपथविधी सोहळा भव्य आणि अविस्मरणीय होण्यासाठी भाजपने जय्य्त तयारी केली होती. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, भाजपसाशित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योजक, साधू-महंतांना निमंत्रण देण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, बॉलिवूडमधील अभिनेते-अभिनेत्रींनादेखील आमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा सत्तेत आले आहे.योगि  हे 37 वर्षातील पहिले मुख्यमंत्री आहेत, जे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एक टर्म पूर्ण करून पुन्हा सत्तेवर विराजमान झाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply