गोवा : प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळूनसुद्धा लांबलेल्या शपथविधी सोहळ्यामागे पक्षात सारे काही ठिक आहे, अशी स्थिती नव्हती. मुख्यमंत्री पदी कोण बसणार हा पेच कायम होता. शनिवारी रात्री उशिरा काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांना गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीला बोलावून सविस्तर चर्चा केली. त्यानंतर सावंत हे रविवारी पहाटे गोव्यात परतले. विश्वजीत राणे यांनीही दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलणी केल्यानंतर ते सायंकाळी उशिरा मुंबईत दाखल झाले. मात्र, आता सरतेशेवटी प्रमोद सावंत यांचीच गोव्याच्या मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेतेपदी प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव विश्वजित राणे यांनी मांडला. सर्वांनी एकमताने सावंत यांची नेतेपदी निवड केली. ते पुढील ५ वर्षे विधिमंडळ पक्षाचे नेते असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. रविवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बैठकीत गोवा आणि उत्तराखंड राज्यांमधील नेतृत्वाबाबत चर्चा केली. निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील सत्तास्थापनेविषयी उपस्थित केलेल्या मुद्यांवर या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. येथील सत्ता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात येईल, असा पुनरुच्चारही या बैठकीत झाला. भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीने नियुक्त केलेले कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री एल. मुरुगन उद्या (सोमवारी) गोव्यात दाखल होत आहेत. संध्याकाळी ५ वाजता ते भाजपच्या सुकाणू समितीशी चर्चा करून विधिमंडळ सदस्यांशी चर्चा करतील. या चर्चेनंतर ते पक्षाचा विधिमंडळ गटनेता निवडण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली होती. दिल्लीत झालेल्या बैठकीत नेता निवडीबरोबर मंत्रिपदाविषयी चर्चा झाली असून, मगोप आणि गोवा फॉरवर्ड यांना मंत्रिमंडळात घेण्याविषयी पक्षाचे वरिष्ठ अनुकूल असले तरी या दोन्हीही पक्षांना मंत्रिमंडळात घेण्याविषयीचा स्थानिक नेत्यांचा विरोध कायम आहे. मात्र, मगोपला सोबत घेण्याच्या सूचना केंद्रीय नेत्यांनी केल्या आहेत.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply