Maharashtra Politics : 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार, विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान; रोख कुणाकडे?

Maharashtra Politics : 'शिंदेना संपवणार, नवीन उदय होणार', असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. 'शिंदेंची गरज आता संपली आहे असेच दिसत आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि पुढे नवीन उदय येईल.', असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. 'शिंदेंना संपवणार, नवीन उदय होणार?' असे वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचा रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. एकनाथ शिंदे यांची गरज संपली का? कदाचित ते बाजूला व्हावेत अशी भीती आहे. आता उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल ही सुद्धा परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत महाराष्ट्रात येईल.

Bhiwandi crime : भिवंडीत कामगारांच्या दोन गटात हाणामारी; एकावर धारधार शस्त्राने वार

तसंच, 'उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काही उदय दोन्ही डग्यावर हात मारून आहे. काही संबंध चांगले करून ठेवले आहे ते उद्याच्या उदयासाठीच आहे.', असे देखील मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका असं मी सांगितले होते, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, 'अंगावर आल्यावर सगळे आठवते. त्यावेळेस का नाही आठवलं? पुढाकार कोणी घेतला. जाऊ नका मग काय सांगताय. पुढे तुम्हीच गेले. दादांसोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता.', असा टोला त्यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply