राज्यभरात उन्हाचे चटके सुरुच; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट

मार्चच्या सुरुवातीच्या पंधरवडय़ातच राज्याला उन्हाच्या चटके लागलेत. मुंबईसह कोकण विभाग विदर्भ आणि त्यानंतर आता मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. मध्यंतरी बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा उष्णतेने डोके वर काढले आहे. हवामान विभागानुसार पुढील चार दिवस राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट असणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये 2 एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान  विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली.

निरभ्र आकाश आणि देशाच्या वायव्येकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात ऊन तळपू लागले आहे. मुंबई-ठाणे परिसरासह कोकणात तर उष्णतेची तीव्र लाट आली आहे. मुंबईचे तापमान सोमवारी ४० अंशांच्या जवळपास पोहोचले, तर रत्नागिरीत कमाल तापमान चाळिशीपार गेले. त्यामुळे या भागात अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे.

विदर्भातही तापमानात झपाटय़ाने वाढ झाली आहे. आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. तापमानातील ही वाढ संपूर्ण राज्यात पुढील ३ एप्रिलपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply