मुंबई : पोलिस उपनिरीक्षकानं ‘खाकी’ला फासला काळीमा

मुंबई : 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे पोलिसांचं ब्रिद वाक्य आहे. जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर, असा या वाक्याचा अर्थ होतो. मात्र, याच ब्रिद वाक्याला काळीमा फासणारी गोष्ट मुंबई पोलिस दलातील एका उप-निरीक्षकानं केलीय.

गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात राहणारी 24 वर्षीय तक्रारदार मुलीनं काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर होणाऱ्या घरगुतीवादामुळं ती माहेरी निघून आली होती. त्यामुळं नवऱ्याकडून तिला वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. याची माहिती मुलीनं तिच्या भावाला दिली. तिचा भाऊ हा एसी सर्व्हिसिंगचं काम करत असून त्याची ओळख पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटणकर यांच्याशी झाली.

दरम्यान, बहिणीला होणाऱ्या त्रासामुळं त्यानं पाटणकर यांच्याशी चर्चा करून मदत करण्याची विनंती केली आणि बहिणीला पाटणकर यांचा नंबर देऊन त्यांना फोन करण्यास सांगितलं. पीडितेनं पाटणकर यांना संपर्क करून मदत मागितली. मार्च 2022 रोजी शंकर यांनी बोलताना त्या पीडितेशी अश्लील संभाषण केलं. तसंच या पोलिस उपनिरीक्षकानं पीडितेच्या मोबाईलवर मध्यरात्री अश्लील मेसेज व फोटो पाठवल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय.

हिलेनं दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटणकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली असून या आरोपांमागची सत्यताही पोलिस पडताळून पाहत आहेत. एका महिलेशी पोलिसच असं वागत असतील तर, सामान्यांचं काय? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply