ZP Election : सोलापूरच्या स्वराज्य बार ढाब्यात EVM मशीन!

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मोहोळ येथील स्वराज्य बार ढाब्यावर एका खासगी वाहनातून नेण्यात आल्याचे उघडकीस आले. उमेश पाटील या नेत्याने हा प्रकार उघडकीस आणत त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले, ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली.

या घटनेमुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ढाब्यावर सापडलेले ईव्हीएम हे अतिरिक्त होते आणि वाहनचालक व निवडणूक अधिकाऱ्यांमधील संवादाच्या अभावामुळे तेथे पोहोचले. मात्र, अतिरिक्त मशीन असले तरी ते ढाब्यावर कसे पोहोचले, हा प्रश्न अनुत्तरित राहिल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असल्याचे म्हणत मतमोजणी थांबवून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *