Zombie Virus in Serbia Russia: रशियामधील एका संशोधनादरम्यान फ्रेंच वैज्ञानिकांना ४८ हजार वर्षांपूर्वीचा एक विषाणू सापडला आहे. रशियामधील एका गोठलेल्या तळ्यामध्ये हा विषाणू सापडला असल्याची माहिती समोर आली आहे. ‘न्यू यॉर्क पोस्ट’च्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार या विषाणूला ‘झोम्बी व्हायरस’ असं म्हटलं आहे. या विषाणूमुळे पुन्हा एकदा करोनापेक्षाही अधिक भयंकर आणि मोठी साथ पसरण्याची भीतीही या वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामधून प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राने ज्या अभ्यासाचा आधारे ही बातमी दिली आहे त्या अभ्यासासंदर्भातील सविस्तर संशोधन अद्याप प्रकाशित झालेलं नाही. प्रकाशनापूर्वीचं काम सुरु असून लवकरच हे संशोधन सार्वजनिक केलं जाणार आहे. “हा पुरातन विषाणू सापडल्याने भविष्यात वनस्पती, प्राणी आणि मानवासाठी परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते,” असं या ‘व्हायरल’ माहितीमध्ये म्हटलं आहे. प्रथामिक अहवालांनुसार वातावरण बदलांमुळे बर्फाच्या खाली असलेली उत्तर गोलार्धामधील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच मानवाला संशोधनानिमित्त पोहोचता आलं आहे. पहिल्यांदाच या गोठलेल्या अवस्थेत असलेल्या विषाणूंशी मानवाशी संबंध आला आहे. मात्र वातावरण बदलांमुळे ‘मागील हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेल्या या विषाणूंच्या माध्यमातून काही जैविक पदार्थांचं उत्सर्जन होण्याची शक्यता आहे,’ असा अंदाज व्यक्त केला जातोय. यामध्ये प्राणघातक विषाणूंचाही समावेश असू शकतो.
“या जैविक घटकांमध्ये पेशी असलेले अतिसूक्ष्म जीव तसेच विषाणूंचा समावेश असू शकतो,” असाही संशोधकांचा अंदाज आहे. वैज्ञानिकांना हे झॉम्बी विषाणू सैबेरियन पठारावरील बर्फाच्या चादरीखालील गोठलेल्या तळ्यामध्ये आढळले. साथीचे रोग पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्या आणि आतापर्यंत ठाऊक असलेला हा विषाणू ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा असल्याचा अंदाज आहे. अनेकांना बाधित करणारा हा विषाणू संसर्गाच्या लाटेदरम्यान या बर्फाच्या चादरी खाली हजारो वर्षांपासून दाबला गेला. हा आता सध्या मानवाला ठाऊक असलेल्या सर्वात जुन्या विषाणूंपैकी एक ठरला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये सैबिरियातच ३० हजार वर्षांपूर्वीच्या विषाणूचा शोध लागला होता.
‘सायन्स अलर्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार या संशोधनादरम्यान १३ वेगवेगळ्या विषाणूंचा शोध लागला असून प्रत्येकाची रचना ही वेगवेगळी आहे. रशियामधील याकुतिया येथील युकेची आल्स नावाच्या तळ्यामध्ये यापैकी मुख्य विषाणूचा शोध लागला आहे. बर्फाखाली गोठलेल्या अवस्थेत असलेल्या सैबेरियन कोल्ह्याच्या केसांमधून तसेच आतड्यांमधून इतर विषाणूंचे अवशेष वैज्ञानिकांना मिळाले आहेत.
हे काही हजार दशकांपूर्वीचे विषाणू संसर्गास कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळेच ते मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. करोनासारख्या विषाणूंच्या संसर्गाच्या लाटा यापुढे सामान्यपणे अनेकदा येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूंच्या माध्यमातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांमुळे बर्फ वेगाने वितळतो आणि त्याचं रुपांतर कार्बन डायऑक्साइड, मिथेनमध्ये होतं. त्यामुळे हरितवायूचं अधिक प्रमाणात उत्सर्जन होतं असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.
या वृत्तांकनामधील माहितीनुसार हा नवीन विषाणू सापडणं ही केवळ एक सुरुवात असून असे इतरही अनेक विषाणू आता सापडतील असा अंदाज आहे. या अनोळखी विषाणूवर प्रकाश, उष्णता, ऑक्सिजनसारख्या गोष्टींबरोबरच इतर नैसर्गिक गोष्टींचा काय परिणाम होतो यावर अधिक संशोधन आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे.
शहर
- Pune : किल्ला चढताना छातीत तीव्र वेदना, पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचा सिंहगडावर हार्ट ॲटॅकनं मृत्यू
- Pune Rural SP : पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती
- Pune News: राज्यात एकाच दिवशी ३ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू, खेड, पिंपरी-चिंचवड अन् मावळमध्ये हळहळ
- Mumbai Airport: मुंबई एअरपोर्ट आणि ताज महल हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस यंत्रणा सतर्क
महाराष्ट्र
- Beed Crime : 'ए पाया पड नाहीतर..' मुंडे टोळीने तरूणाला बेल्टनं झोडलं, नंतर नाक घासून पाया पडायला लावलं
- Mumbai-Thane : घोडबंदरच्या ट्रॅफिकला बाय बाय, मुंबई-ठाणे आणखी जवळ, अंतर २५ मिनिटांनी कमी
- Pune ISIS Case: पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात २ दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई
- Accident News : भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावाचा जागीच मृत्यू
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा