Youth March : पेन्शन नको काम द्या! जुन्या पेन्शनविरोधात बेरोजगारांचा मोर्चा; 'अर्ध्या पगारात काम करु' म्हणत उतरले रस्त्यावर

Kolhapur : राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा संप सुरू आहे. ज्याचा फटका सामान्य जनतेला बसताना दिसत आहे. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. एकीकडे कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी लढत असताना दुसरीकडे आम्हाला पेन्शन नको, काम द्या या मागणीसाठीही कोल्हापूरमध्ये एक मोर्चा निघाला आहे. सध्या या मोर्चाची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी गेली ४ दिवस संप पुकारला आहे. या विरोधात आता कोल्हापुरातील बेरोजगारांनी आंदोलन छेडल आहे. 'जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा' असं म्हणत बेरोजगारांनी मोर्चा काढला आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा निघाला आहे. आम्हाला पेन्शन नको आम्ही अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहे पण आम्हाला काम द्यावं अशी मागणी इथे जमलेल्या तरुणांनी केलेली आहे.

जुनी पेन्शन योजना थांबवा महाराष्ट्र वाचवा, असे पोस्टर या युवकांनी सोशल मीडियावर टाकलेत. आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहोत. असं या बेरोजगार युवकांचं म्हणणं आहे. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी टाऊन हॉल परिसर घोषणांनी आणि थाळी नाद करत दणाणून सोडला. कोल्हापुरात आज बेरोजगारांचा मोर्चा निघणार अशी पोस्ट गेली चार दिवस विविध माध्यमांवर फिरत आहे. मात्र या मोर्चाचे नेतृत्व करणारा समोर न आल्यामुळे हा मोर्चा काही तरुणांनी काढला.

आता काही दिवसातच पोलिसांची रीतसर परवानगी घेऊन जुन्या पेन्शन विरोधात आणि तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी बेरोजगार तरुण मोर्चा काढणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले आहे.

एकीकडे जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तर दुसरीकडे आम्हाला काम द्या. आम्ही अर्ध्या पगारात काम करायला तयार आहे. अशी मागणी करत बेरोजगारांनी काढलेला प्रति मोर्चा हा आज पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply