Yogesh Kadam Car Accident : शिंदे गटाचे आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात; घातपाताचा संशय

Yogesh Kadam Car Accident : रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

योगेश कदम हे सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. टँकरने आमदार कदमांच्या कारला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामागे घातपात घडवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, शिंदे गटातील शिवसैनिकांकडून अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

आमदार योगेश कदम यांच्या कारला कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत अपघात झाला. कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असतानाही टँकरने धडक दिली.शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.आमदार योगेश कदम हे मुंबईला कारने जात होते. त्याचवेळी पोलादपूरमधील चोळई गावच्या हद्दीत एका टँकरने त्यांच्या कारला धडक दिली.ही धडक जाणीवपूर्वक दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातातून योगेश कदम हे बचावले आहेत. ते सुखरूप असून, तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.चोळई गावच्या हद्दीत आले असता, कारला टँकरने धडक दिली. आमदारांच्या कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने होती. तरीही टँकरने धडक दिली कशी? हा अपघात झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अपघातानंतर आमदार योगेश कदम हे मुंबईला दुसऱ्या वाहनाने रवाना झाले आहेत. तर अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. आमदारांच्या कारला धडकल्यानंतर टँकर उलटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.शिंदे गटातील शिवसैनिकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.दरम्यान, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती आहे. या अपघातात आमदार कदम यांच्या कारचे आणि पोलीस वाहनाचेही नुकसान झाले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply