
Yavatmal News : राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्स युक्त चॉकलेट आणले आहेत. हे चॉकलेट राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. मात्र यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत असलेल्या मिलेट्स चॉकलेट मध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. हा प्रकार लक्षात येताच पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले. त्यातील 65 पालकांनी हे चॉकलेट घरी नेले. मात्र, त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळेत येत मुख्याध्यापकांना जाब विचारत ते चॉकलेट परत केले. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे.
|
Yavatmal Crime : युवकानं अंगावर पेट्राेल ओतून घेतल्याने पंचायत समिती कार्यालयात उडाला गाेंधळ |
मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये आढळल्या चक्क अळ्या
राज्य शासनाने मध्यान्ह भोजन योजनेतून शालेय पोषण आहारासह मिलेट्स युक्त चॉकलेट आणले आहेत. हे चॉकलेट बाजरी, रागी, नाचणी, ज्वारी आणि मिक्स फ्रुट पासून तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यात 25 असे तीन टप्प्यात 75 चॉकलेट वितरित करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चॉकलेट अत्यंत लाभदायी असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय. मात्र, मार्च महिन्यात तयार केलेले हे चॉकलेट पुण्यावरून एप्रिल महिन्यात जिल्ह्यात पोहोचल्याने शाळेतील शिक्षकांची पंचाईत झाली आहे.
विशेष म्हणजे हा शालेय पोषण आहार जानेवारी आणि फेब्रुवारीचा आहे. असे त्यावर नमूद करण्यात आले. कंपनीने पाठवलेल्या चॉकलेटची निर्मिती ही मार्च महिन्यातील असताना तो जानेवारी आणि फेब्रुवारीचा पोषण आहार म्हणून त्या कसा काय पाठवण्यात आला, याबद्दल प्रश्न निर्माण होतो आहे. या संदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांना विचारणा केली असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले असून लवकरच अहवाल प्राप्त होणार असल्याचे सांगितले आहे.
चक्क सव्वा कोटीचे चॉकलेट शाळेत दाखल
जिल्ह्यातील 2 हजार 700 शासकीय, माध्यमिक, खासगी, अनुदानित शाळांना हे चॉकलेट पोहचली आहेत. या शाळांमधील दोन लाख 56 हजार 841 विद्यार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 42 हजार चॉकलेट वितरित करण्याचे उद्धिष्ट आहे. मात्र, एकीकडे शाळांना सुट्टी लागल्यानंतर चॉकलेटचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा झाल्याने पुरवठादाराचाही गलथानपणा पुढे आला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

