Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून येणाऱ्या पाहुण्यांवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ४ ठार, १० जण जखमी

Yavatmal News : राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ भीषण दुर्घटना घडली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत यवतमाळकडे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या वाहनाला ट्रकने जोराची धडक दिली. यात चार जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये २ लहान मुले

प्रविण महाजन यांनी सदर अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. अपघातात मृ्त्या झालेल्यांमध्ये २ लहान मुलांचा समावेश असून दोन्ही मुले एकाच घरातील असल्याने हळवळ व्यक्त करण्यात येत आहे.

Devendra Fadnavis : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, देवेंद्र फडणवीस यांची माहिती; नाशिक-ठाण्याची जागा मिळणार शिंदेंना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथे लग्नाचा स्वागत समारंभ होता. हा संभारंभ आटोपून पाहुणे परत यववतमाळकडे निघाले होते. राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ पाहुण्यांचं हे वाहन रस्त्याच्या बाजूला उभे होतं. यावेळी भरधाव आलेल्या ट्रकने वाहनाला जोरदार धडक दिली. पोलिसांना याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून सर्वांना वाहनातून बाहेर काढल. यात ४ जणांचा जागीच ठार झाले होते ज्यात २ मुलांचा समावेश आहे, तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply