Yavatmal DCC Bank : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेला एक कोटीचा दंड, आरबीआयची कारवाई

Yavatmal DCC Bank : रिझर्व बँकेच्या पतधोरणानुसार पर्याप्त भांडवल मर्यादा न पाळल्याने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर  दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आता पर्यंत बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे. 

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सध्या अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यातून बँकेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी मायक्रो प्लॅनिंग सुरू केले होते. त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्न यशस्वी होतील अशी खात्री कर्मचाऱ्यांना होती.

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण करणार

कठीण प्रसंगातून मार्ग निघत असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी दोन महिन्यांतच राजीनामा दिला. बँकेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून दोन महिन्यात दोन सीईओंनी राजीनामे दिल्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली. दरम्यान देशपांडे यांच्या राजीनाम्याची बाब कर्मचाऱ्यांना पचनी पडलेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply