World Human Rights Day : जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त 'जागर मानवी हक्काचा' या कार्यक्रमाचे आयोजन

World Human Rights Day :  रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जाधवर ग्रुप ऑफ इंन्सिट्यूट यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमीत्त 'जागर मानवी हक्काचा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पुण्यातील घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह व कलादालन येथे सायंकाळी ५ ते ८ या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातून मानवतेच्या दृष्टीने सामाजिक कार्य करीत असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना व चळवळ यांच्या कार्याला अधिक स्फूर्तीबळ मिळावे या हेतूने त्यांना 'मानवाधिकार पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात संविधान प्रचारक 'लोकचळवळ' यांना विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लोकचळवळीच्या माध्यमातून संविधानिक उद्देशिका, संविधानिक भारताचे स्वरूप व संविधानिक भारताचे मूल्यांवर लोकांच्या दैनंदिन जीवनात जोडणाऱ्या कार्य व संविधानिक उद्देशिकाच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत संविधान पोहोचवून जनजागृती कार्यक्रमासाठी त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.

Supreme Court Verdict On Article 370 : कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

या कार्यक्रमात मानवी हक्क संरक्षण जागृतीचे संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर यांनी संकलन केलेल्या "मानवी हक्काचा रक्षक" या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथिंच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य सुधाकरराव जाधवर सर होते. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश सोनल पाटील, मा. आर. व्ही. जटाळे - (निवृत्त न्यायाधीश सत्र न्यायालय - अध्यक्ष ,पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे विभाग), पोलीस उप आयुक्त संदीप सिंग गिल, मा. सुरेंद्रकुमार मानकोसकर (जी. एस. टी. आयुक्त), समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष जाधव, कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे, संविधान अभ्यासक सुभाष वारे, प्रसिद्ध उद्योजक युवराज ढमाले, पत्रकार श्याम आगरवाल (संपादक दैनिक आज का आनंद), शार्दूल जाधवर, नायब तहसीलदार मदन जोगदंड (राजगुरुनगर) आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply