Western Railway : पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, प्रवाशांचे मेगा हाल! दादर, अंधेरीसह प्रत्येक स्टेशनवर गर्दी


Mumbai : माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २४-२५ व २५-२६ जानेवारीला रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत 275 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

1888 मध्ये बांधलेला लोखंडी स्क्रू पाइल रेल्वे पूल काँक्रीटच्या खांबांनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने २४ व २५ जानेवारीच्या रात्री ११.०० ते सकाळी ८.३० या वेळेत विशेष ब्लॉक घोषित केला आहे. या कामामुळे अनेक लोकल गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना सकाळच्या वेळी प्रवासात अडथळ्यांचा सामना करावा लागला. प्रवाशांनी यामुळे होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Pune Accident : पुण्यात भल्या पहाटे भीषण अपघात, वाढदिवसाची पार्टी करून येताना काळाचा घाला, २ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी आणि बोरिवली या महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. सहा महत्त्वाच्या स्थानकांवर धीम्या लोकल थांबत नसल्याने प्रवाशांचा संताप वाढला. चर्चगेट ते दादर जलद मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होती, तर विरार ते अंधेरी दरम्यान काही लोकल चालू होत्या. मात्र, अंधेरीहून पुढे लोकल उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ७.३० नंतर रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर दररोज लाखो प्रवासी अवलंबून आहेत. पश्चिम रेल्वेने देखभालीसाठी २४ जानेवारीच्या रात्री विशेष ब्लॉक घेतल्याने रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. पश्चिम रेल्वे मार्गावरील काही गाड्या अद्यापही काही मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने कामे लवकर पूर्ण करून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन सावधगिरीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply