West Bengal News : मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये राडा, मारहाणीत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू; भाजपवर आरोप

West Bengal News : एकीकडे लोकसभा निवडणुकांचे सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना घडली आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका टीएमसी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

देशभरात आज लोकसभा निवडणुकांच्या सहाव्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणासह पश्चिम बंगालमध्ये आज मतदान होणार आहे. अशातच मतदानापुर्वी पश्चिम बंगालमधून भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मतदानाच्या काही तास आधी टीएमसी कार्यकर्त्याची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Narendra Modi : सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान मोदींची पोस्ट; मतदारांना केलं खास आवाहन

पश्चिम बंगालमधील महिषा दलाच्या धमितानगर भागात ही घटना घडली. शेख मोईबुल (४२) असे मृताचे नाव आहे. मोईबुल शुक्रवारी सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत होता. तो रजनीगंज मार्केट परिसरातून जात असताना काही लोकांशी त्याचा वाद झाला. यावेळी त्याला बेदम मारहाण करण्यात आली तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तर आणखी एका घटनेत टीएमसी कार्यकत्यावर हल्ला करण्यात आला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, मागच्याच आठवड्यात भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपच्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply