Weather Update News : तामिळनाडूमध्ये पावसाचा कहर, पुरामुळे जनजीवन विस्कळीत; तर उत्तर भारतात बर्फवृष्टीने पारा घसरला

Weather Update News : तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तामिळनाडूतील तिरुनेलवेली, तुतीकोरीन, तेनकासी आणि कन्याकुमारी चार जिल्हे अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये सोमवारी 18 डिसेंबरसार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, बँका, खाजगी आस्थापना आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या देखील बंद राहतील. भारतीय हवामान विभागाने आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोमोरिन परिसरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर होत आहे.

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? रुग्णालयात उपचार सुरू, पाकिस्तानात काय घडतंय?

तामिळनाडूमध्ये पाऊस तर उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे तापमानाच्या पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. गुलमर्ग ते औली पर्यंतच्या पर्वतांवर बर्फाची चादर पसरली आहे. बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बहुतांश शहरांमध्ये दिसून येत आहे. उत्तर भारतात तापमानात घट दिसून येते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply