Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, दिल्ली-NCR मध्ये दाट धुके आणि बर्फवृष्टी

 

Weather Update : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल जाणवला आहे. डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू असताना, उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट कायम आहे. हवामान खात्याने दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये घनदाट धुक्याचा इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

बुधवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये घनदाट धुके पसरले असून, तापमान खूपच कमी असल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेत थंडीपासून बचाव करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. राजधानीच्या अनेक भागांमध्ये धुके, हलके धुके आणि काही ठिकाणी मध्यम धुक्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दुपारी वाऱ्याचा वेग ताशी १४ ते १८ किलोमीटरपर्यंत वाढेल, तर संध्याकाळपर्यंत तो हळूहळू कमी होऊन ताशी ८ किलोमीटरवर येईल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज दिल्लीत कमाल तापमान १७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ८ अंश सेल्सिअस राहील. काश्मीर खोऱ्यात थंडीची तीव्रता वाढली असून, तेथील नागरिकांसाठी ती मोठी समस्या ठरत आहे.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याला तात्काळ अटक करा, मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक; जलसमाधी आंदोलन सुरू

स्कीइंग'साठी प्रसिद्ध गुलमर्ग येथील किमान तापमान उणे ११.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हलकी आणि नंतर मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ०१ आणि ०२ जानेवारी रोजी वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ०३ ते ०६ जानेवारीदरम्यान मध्यम ते मुसळधार बर्फवृष्टी होईल, तर ०४ ते ०६ जानेवारीदरम्यान काही ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जाणून घ्या शहरातील तापमान

दिल्ली- ८ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि १८ अंश सेल्सिअस कमाल तापमान

नोएडा- १० अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २१ अंश सेल्सिअस कमाल तापमान

गाझियाबाद- ९ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि १८ अंश सेल्सिअस कमाल तापमान

पाटणा- १२ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २३ अंश सेल्सिअस कमाल तापमान

लखनौ- ११ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २३ अंश सेल्सिअस कमाल तापमान

जयपूर- १० अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २२ अंश सेल्सिअस कमाल तापमान

भोपाळ- ८ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि २२ अंश सेल्सिअस कमाल तापमान

मुंबई- १७ अंश सेल्सिअस किमान तापमान आणि ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply