Weather Update : कोकणात पावसाचा जोर वाढणार! सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट,जगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Weather Update : गेल्या दाेन दिवासंपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे जगबुडी नदीची पाणी पातळी 6.20 मीटरपर्यंत पाेहचली आहे. या नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खेड तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचत असल्याने शेतीची कामे धिम्या गतीने सुरु आहे. पावसाचा जाेर वाढत असल्याने जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ हाेत असल्याचे चित्र आहे.

Pune Crime : जादूटोण्यावरून ज्येष्ठाच्या खुनाचा प्रयत्न; दोन लाखांची सुपारी, सहकार पोलिसांकडून तिघांना अटक

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनूसार जगबुडी नदीची पाणी पातळी 6.20 मीटर पर्यंत पाेहचली आहे. या नदीची धोका पातळी 7 मीटर आहे. पावसाचा जोर कायम राहीला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसह इतरही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागात थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे अद्याप कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply