Rain Update: मुंबईसह 16 जिल्ह्यात पुढील 48 तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता; येलो अलर्ट जारी

Weather Update: मुंबईमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस पडला. याशिवाय रायगड, पालघर आणि ठाण्यामध्येचांगला पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत मुंबईसह जवळच्या परिसरात हवामान ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे

विदर्भामध्ये विजांसह ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासामध्ये राज्यातील विविध भागामध्ये पाऊस पडला आहे. मुबईमध्ये मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. कुलाबामध्ये २४.४ डिग्री सेल्सियन तापमान नोंदवण्यात आले आहे. साताक्रूझ येथे २५.५ डिग्री तापमान नोंदवण्यात आले. कुलाब्यात ५५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Maratha Reservation : आरक्षण द्या, अन्यथा विधानसभा लढवू - मनोज जरांगे

 

शहरासह इतर भागात बुधवारी थंड हवा अनुभवायला मिळाली. पुढच्या ४८ तासामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबई, पालघर रायगडसह इतर १६ जिल्ह्यांना वेलों अलर्ट जारी केला आहे. किनारी भागामध्ये जोराचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांसाठी मुबई शहर आणि उपनगरासाठी स्थानिक अंदाजानुसार, शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३००८ आणि २५०८ च्या आसपास असेल



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply