Water Shortage In Pardi : मेहकरमधील पारडी गावात भीषण पाणी टंचाई, महिलांचा हंडा माेर्चा

Water Shortage In Pardi : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास ७० गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. हीच अवस्था मेहकर तालुक्यातील पारडी गावाची झाली आहे. 

पारडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तरी ग्रामसेवकाला काही देणे घेणे नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Vishal Patil : सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार; पक्षातील वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर विशाल पाटील यांचं जनतेला पत्र

बुलढाणा जिल्हा प्रशासन निवडणुकीत गुंतले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर भेड्सावणाऱ्या समस्याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. पारडी येथील महिला चांगल्याच संतापल्या आहेत. दरवर्षी आमच्या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाही करावा लागतोय. पण् यावर्षी टँकर नाही अन् उपाययोजना तर काहीच नाही अशी खंत महिलांनी व्यक्त केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply